Goa Express - Vasco - Nizamuddin Express  Dainik Gomantak
देश

Goa Express: गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसला मध्यप्रदेशातील 'या' ठिकाणी थांबा देण्याची मागणी...

रेल्वे अप डाऊनर्स प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनचे निवेदन

Akshay Nirmale

Goa Express: गोवा एक्सप्रेस म्हणजेच गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस या रेल्वेगाडीला मध्यप्रदेशातील एका ठिकाणी थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे ठिकाण आहे बिना रेल्वे स्टेशन. मध्यप्रदेशातील या स्टेशनवर गोवा एक्सप्रेसला थांबा द्यावा, यासाठी रेल्वे अप डाऊनर्स प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

असोसिएशनच्या सदस्यांनी बिना स्थानकाशी संबंधित रेल्वे समस्या सोडविण्यासाठी रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन दिले. त्यात ही मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भोपाळ विभागातील भोपाळ-विदिशा-बिना सेक्शनवर स्थानिक नागरिक आणि दैनंदिन अप-डाउन करणाऱ्यांना भोपाळ, बिना, गंजबासोडा, विदिशा आणि आसपासच्या तहसील भागात दररोज जावे लागते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या स्टेशनवर गोवा एक्सप्रेस (गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस) सह तामिळनाडू एक्सप्रेस आणि कालका एक्सप्रेस या तीन गाड्यांना येथे थांबा द्यावा.

दरम्यान, या निवेदनात इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भोपाळ राज्यराणी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करावा, ही मागणी आहे. या ट्रेनची वेळ दमोह स्थानकावर 6 वाजता असावी आणि ती 10.30 पर्यंत भोपाळ जंक्शनला पोहोचली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.

दैनंदिन अप-डाउन करणारे, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी ट्रेनच्या वेळा बदलण्याची नितांत गरज आहे.

याशिवाय भोपाळ सिंगरौली एक्स्प्रेस रोज चालवावी. बीना आणि भोपाळ रोजच्या अपडाऊनसाठी ही ट्रेन अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सिंगरौली एक्स्प्रेस आठवड्यातून 2 दिवस चालवण्याऐवजी ती दररोज चालवावी.

यावेळी बिना मंडळाचे अध्यक्ष नितीश दुबे म्हणाले की, आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. राज्यराणी एक्स्प्रेसच्या वेळा बदलण्यात याव्यात. भोपाळ प्रतापगड ट्रेन मंगळवार, शुक्रवार, रविवारी भोपाळ येथून संध्याकाळी 7.15 वाजता आहे. ज्याची वेळ 8 वाजता असावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT