Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

देशातील सर्व डॉक्टरांना भारत रत्न द्या- Arvind Kejriwal

अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी कोरोना(Covid 19) साथीच्या विरोधात लढा देणार्‍या सर्व डॉक्टर आणि परिचारिकांना यावर्षी भारतरत्न(BharatRatn) मिळावे अशी मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.

यामुळे संपूर्ण देश आनंदी होईल, जे लोक आपल्या जीवनाची आणि कुटुंबाची चिंता न करता लोकांची सेवा करतात त्यांना हा सन्मान मिळेल. ही 'शहीद' डॉक्टरांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा आशयाचे पत्र त्यांनी पंतप्रधाना लिहले आहे.

तसेच त्यांनी ट्विट करत, "यावर्षी "भारतीय डॉक्टरानां " भारतरत्न मिळाला पाहिजे. “इंडियन डॉक्टर” म्हणजे सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिक्स. शहीद डॉक्टरांना ही खरी श्रद्धांजली ठरेल. जे त्यांचे जीवन आणि कुटुंबाची चिंता न करता सेवा करतात त्यांच्यासाठी हा सन्मान असेल. संपूर्ण देश यासह आनंदी होईल. " अशी भावना व्यक्त केलीय आहे.

तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी देशातील डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांनी त्यांच्या जीवावर खेळून लोकांचे प्राण वाचवले आहेत, त्यांना नक्कीच आदर मिळायला हवा.असे मत मांडले आहे.

जूनच्या मध्यात इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनव्हायरसच्या दुसर्‍या लाटेमध्ये एकूण 730 डॉक्टरांचा जीव गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT