Arvind Kejriwal in Gujrat Dainik Gomantak
देश

भाजपाचा अहंकार तोडण्यासाठी एक संधी द्या - अरविंद केजरीवाल

गुजरात, भरूच येथे एका कार्यक्रम्यान केजरीवाल यांनी केलं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

येत्या काही दिवसात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने ही प्रचार सुरु केला असून भाजपाचा अहंकार तोडण्यासाठी एक संधी द्या असे ही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील भरूच येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. (Give Aam Aadmi Party a chance in Gujarat )

यावेळी त्यांनी विमानप्रवासात घडलेली एक घटना सांगितली आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, ”विमानातून प्रवास करताना, एक भाजपाचा नेता मला भेटला होता. त्याच्याशी गप्पा सुरू असताना मी त्याला विचारलं की, गुजरातमध्ये तुमची सत्ता असूनही तुम्ही काम का करत नाहीत? यावर तो म्हणाला की, आम्हाला काम करण्याची गरज काय ? येथील लोकं आम्हाला मतदान करत आहेत.

संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते आमच्या खिशात आहेत. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ते आमच्याकडे येऊ शकतात.” हा प्रसंग सांगून केजरीवालांनी गुजरातच्या साडेसहा कोटी जनतेला आवाहन केलं की, “भाजपाचा हा अहंकार तोडण्यासाठी आम आदमी पार्टीला एक संधी द्या.

जर आम्ही काम करत नाही, असं तुम्हाला वाटलं तर पुढच्या वेळी आम्हाला मतं देऊ नका. पण एक संधी द्या” अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. असे म्हणत त्यांनी पुन्हा भ्रष्टाचारमुक्त शासन स्थापनेसाठी आम्हांला फक्त एकदा संधी देण्याचे ही आवाहन त्यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

Horoscope: शनिवार 'या' राशींसाठी ठरणार लकी! वैवाहिक जीवनात फुलणार प्रेमाचे रंग; होणार मोठी भरभराट

SCROLL FOR NEXT