Girl Making Reel On Rooftop Monkey Attack: आजकाल सोशल मीडियावर रील्स बनवण्याचे जणू एक फॅडच आले आहे. अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील्स बनवतात, तर काही जण केवळ मनोरंजनासाठी. परंतु, काही वेळा रील्सच्या नादात लोक असे काही मूर्खपणाचे कृत्य करतात, ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलीला रील बनवण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी घराच्या छतावर असलेल्या कठड्यावर उभी राहून रील बनवण्यासाठी डान्स करताना दिसत आहे. तिच्याजवळच कठड्यावर दोन माकडे बसलेली आहेत. ती नाचत असताना माकडाला तिचा डान्स कदाचित आवडत नाही किंवा तो त्याला विचित्र वाटतो. त्यामुळे त्यातील एक माकड तिला धडा शिकवण्याचा प्रयत्न करते.
व्हिडिओमध्ये दिसते की, माकड आधी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करते, पण त्याला तिचा हात काही पकडता येत नाही. त्याचवेळी, माकड तिचे कसे पकडून ओढ लागते. हा प्रकार घडताच मुलगी घाबरुन डान्स थांबवते. काही सेकंद केस ओढल्यानंतर माकड तिला सोडून देतो आणि ती तिथून पळ काढते. माकडाच्या या कृत्यामुळे मुलीला कोणताही धोका झाला नाही, पण रीलच्या नादात केलेला हा मूर्खपणा तिला चांगलाच भोवला.
हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रील्सच्या वेडापणामुळे आता प्राणी देखील त्रस्त झाले आहेत, असा संदेश लोकांमध्ये जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, ‘प्रत्येकजण रील्स बनवण्याच्या मागे धावत आहे, त्यामुळे प्राणीही वैतागले आहेत,’ अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. हा व्हिडिओ एक्सवर @syadvada169665 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी मुलीच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. एका युजरने कमेंट केली की, ‘अशा रील बनवणाऱ्यांना सर्कसमध्ये टाकावे, लोक तिकीट घेऊन त्यांना बघतील.’ दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘सगळेच यांच्यामुळे त्रासलेले आहेत.’ तर, तिसऱ्याने लिहिले की, ‘बरं झालं, सस्त्यात सुटली, नाहीतर मोठा कांड झाला असता.’ चौथ्या युजरने तर माकडाची स्तुती करत लिहिले, ‘खूप छान मोंकेश भाई.’
दुसरीकडे, या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर रील बनवण्याच्या फॅडवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्धीसाठी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी लोक स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखी कृत्ये करत आहेत, असे या व्हिडिओतून दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.