Krishna Janmashtami Dainik Gomantak
देश

Ghaziabad ला 'मिनी काश्मीर' का म्हणतात? जिथे काश्मिरी पंडित खास पद्धतीने साजरी करतात जन्माष्टमी

गाझियाबादच्या सर्व मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो, परंतु गाझियाबादच्या शालीमार गार्डनमध्ये जन्माष्टमी एक दिवस आधी साजरी केली जाते.

दैनिक गोमन्तक

Krishna Janmashtami 2022: धार्मिक ग्रंथांनुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री म्हणजे 12 वाजता रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे पंचांगानुसार यंदा 19 ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा केला जात आहे. जन्माष्टमीच्या सणानिमित्त मंदिरांमध्ये श्रीकृष्णाच्या बालरूपाची सजावट करण्यात आली आहे. गाझियाबादच्या सर्व मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो, परंतु गाझियाबादच्या शालीमार गार्डनमध्ये जन्माष्टमी एक दिवस आधी साजरी केली जाते. असे का करतात हे तुम्हाला माहित आहे का?

खरं तर, शालिमार गार्डनमध्ये मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित राहतात, त्यामुळे याला 'मिनी काश्मीर' असेही म्हणतात. काश्मिरी पंडित अष्टमीच्या एक दिवस आधी जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी उपवास देखील केला जातो आणि दिवसभर कृष्णाची पूजा केली जाते. मंदिरांमध्ये कान्हाच्या बालरूपाचे झुलवत स्वागत केले जाते.

काश्मीरमध्ये निघते कृष्णाची झाकी

काश्मीरमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी झाकी काढली जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वजण या झाकीमध्ये सामिल होतात. मात्र 1990 च्या शोकांतिकेनंतर ही परंपरा संपुष्टात येऊ लागली मात्र आजही कृश्णाची झाकी इथे उत्साहात काढली जाते. परंतु या झाकीला पुर्वीचे स्वरूप राहिले नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

काश्मिरी गाण्यांनी कान्हाचे स्वागत करण्यात आले

मंदिरातील काश्मिरी गाण्यांनी संपूर्ण वातावरण कृष्णमयी झाले. विशेष काश्मिरी स्तोत्रांनी श्री कृष्णाची पूजा करण्यात आली. काश्मिरी समाजातील लोकांनी मंदिर परिसरात जमून कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली. मंदिरातील झुल्यावर बाल गोपाळांची मूर्तीही ठेवण्यात आली होती, येथे येणारे भाविक बाल गोपाळांना झुलवून आशीर्वाद घेत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT