Champions Trophy Dainik Gomantak
देश

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून 'हा' स्टार खेळाडू बाहेर; संघाला मोठा झटका

Gerald Coetzee: गेराल्ड कोएत्झीला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघातूनही वगळण्यात आलं आहे, ज्याची अधिकृतपणे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं पुष्टी केली आहे.

Sameer Amunekar

Champions Trophy 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना १९ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे, जी ८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला संघातून वगळण्यात आलं आहे.

इतकंच नाही तर कोएत्झीला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघातूनही वगळण्यात आलं आहे, ज्याची अधिकृतपणे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं पुष्टी केली आहे.

गेराल्ड कोएत्झी संघातून बाहेर का?

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला दुखापतीमुळं एकदिवसीय मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागलं आहे. गेराल्डला बॉलिंग करताना कंबरेत त्रास जाणवला. त्यामुळे गेराल्डला त्या सामन्यातूनच बाहेर पडावं लागलं होतं.

दरम्यान गेराल्ड हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू आहे. आधी त्याच्या आधी एनरिक नॉर्खियानं दुखापतीमुळं या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

०८ फेब्रुवारी २०२५: पहिला एकदिवसीय सामना, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड

१० फेब्रुवारी २०२५: दुसरा एकदिवसीय सामना, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

१२ फेब्रुवारी २०२५: तिसरा एकदिवसीय सामना, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका

१४ फेब्रुवारी २०२५: अंतिम सामना,

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), इथन बॉश, मॅथ्यू ब्रीट्झके, गेराल्ड कोएत्झी, ज्युनियर डाला, वियान मुल्डर, मिहलाली मपोंगवाना, सेनुरन मुथुसामी, गिडॉन पीटर्स, मायकेल प्रिन्स, जेसन स्मिथ आणि काइल व्हेरेन.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दक्षिण आफ्रिकेचे वेळापत्रक

२१ फेब्रुवारी २०२५: दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान

२५ फेब्रुवारी २०२५: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

०१ मार्च २०२५: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT