Crime News  Dainik Gomantak
देश

Jharkhand Crime: धक्कादायक! चार मुलांच्या आईचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, नराधमांनी...

Jharkhand Crime: झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्याच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Manish Jadhav

Jharkhand Crime: झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्याच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे तीन नराधमांनी चार मुलांच्या आईचे अपहरण केले आणि तिला शेतात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला.

या घटनेदरम्यान महिला बेशुद्ध पडली तेव्हा ती मृत झाल्याचा समज नराधमांनी केला. यानंतर तिला नग्न अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले.

सकाळी ही बाब गावकऱ्यांना समजली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या संदर्भात पीडित महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्कार, हत्येचा प्रयत्न अशा संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापपर्यंत आरोपींचा सुगावा लागलेला नाही.

पीडितेच्या पतीने पोलिसांना (Police) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रोजंदारीसाठी तो अनेकदा घराबाहेर राहतो. गुरुवारीही तो कामानिमित्त घराबाहेर पडला होता. याचाच फायदा घेत आरोपींनी ही घटना घडवली.

पीडितेच्या पतीने सांगितले की, त्याच्या अनुपस्थितीत पत्नी घराचा दरवाजा आतून बंद करुन चार मुलांसोबत झोपली होती. दरम्यान, तीन बदमाशांनी आधी पत्नीचे तोंड कापडाने बांधले आणि नंतर तिला जबरदस्तीने उचलून जवळच्या शेतात नेले. जिथे तिचे सर्व कपडे फाटले होते.

यानंतर नराधमांनी पत्नी बेशुद्ध होईपर्यंत तिच्यावर बलात्कार केला. तर पत्नी बेशुद्ध झाल्यावर आरोपीला वाटले की, ती मेली आहे. यानंतर आरोपींनी तशाच अवस्थेत घटनास्थळावरुन पळ काढला.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील हॉट गम्हरिया पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. पीडितेच्या पतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन अज्ञातंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी करुन तिला रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेवर (Women) इतके अत्याचार केले की, तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली. सध्या रुग्णालयात दाखल महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT