Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'कांड' करायला गेला अन् भलतचं होऊन बसलं! चिमुरड्याचा निशाणा चुकला आणि आजोबांना बसला जबरदस्त फटका; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

Kid Hitting Stick Video: सध्या असाच एक अत्यंत मजेशीर आणि हास्यास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून त्यातील एका चिमुरड्याच्या 'चुकीच्या निशाण्याने' सर्वांचे मनोरंजन केले.

Manish Jadhav

Funny Viral Video: सोशल मीडिया हा एक असा फ्लॅटफॉर्म आहे जिथे कधी, काय आणि कसे व्हायरल होईल, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. दररोज इंटरनेटवर हजारो व्हिडिओंची रेलचेल पाहायला मिळते, परंतु त्यातील काही मोजकेच व्हिडिओ लोकांच्या नजरेत भरतात आणि पाहता पाहता वाऱ्यासारखे व्हायरल हतात. जे व्हिडिओ सगळ्यात हटके असतात किंवा ज्यामध्ये काहीतरी अनपेक्षित घडते, ते नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. सध्या असाच एक अत्यंत मजेशीर आणि हास्यास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत असून त्यातील एका चिमुरड्याच्या 'चुकीच्या निशाण्याने' सर्वांचे मनोरंजन केले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीपाशी अत्यंत शांतपणे बसलेला दिसतो. त्याच्या हातात एक काठी असून तो आपल्याच तंद्रीत शेकोटीचा आनंद घेत असतो. इतक्यात, पाठीमागून एक खोडकर व्यक्ती येते आणि त्या मुलाच्या डोक्यावरील टोपीशी छेडछाड करुन त्याला त्रास देते. खोड काढून ती व्यक्ती लगेच तिथून पळ काढते. आपल्या शांततेत विनाकारण व्यत्यय आल्यामुळे तो चिमुरडा प्रचंड संतापतो. तो रागाच्या भरात आणि एखाद्या 'अ‍ॅक्शन हिरो'च्या जोशात उभा राहतो आणि आपल्या हातात असलेली काठी त्या व्यक्तीच्या दिशेने पूर्ण ताकदीने भिरकावतो.

परंतु, या कहाणीमध्ये एक मोठा ट्विस्ट येतो. त्या मुलाने मारलेली काठी ज्याने खोड काढली त्याला न लागता, समोरुन शांतपणे चालत येणाऱ्या एका निर्दोष आजोबांना जाऊन जोरात लागते. आजोबांना काही कळण्याच्या आतच हा फटका बसतो आणि तिथे एकच हशा पिकतो. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याची अधिकृत माहिती नसली तरी 'ghantaa' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तो पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी यावर अतिशय मिश्किल कमेंट्स केल्या आहेत.

एका युजरने कमेंट करताना लिहिले की, "या मुलाला स्वतःला 'थॉर' समजतोय काय?", तर दुसऱ्याने "कांड करायला जातो आणि पाप होऊन बसतं" असे म्हणत आजोबांच्या फजितीवर हळहळ व्यक्त केली आहे. एकाने तर याला "कर्म आणि कांड यांची जुगलबंदी" असे नाव दिले आहे. मुलाचा तो निरागस राग आणि नेम चुकल्यामुळे बिचाऱ्या आजोबांची झालेली ती अनपेक्षित फजिती यामुळे हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर (Internet) चर्चेचा विषय ठरला आहे. धावपळीच्या जीवनात असे मजेशीर क्षण लोकांसाठी हास्याची पर्वणी ठरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT