Corona Dainik Gomantak
देश

'स्वप्नपूर्तीसाठी' भारत सरकारच्या दरबारी मुलीची साद

भारतातील पहिली कोरोना रुग्ण दोन वर्षांपूर्वी भारतात परतली होती आणि 30 जानेवारीला तिचा रिपोर्ट सकारात्मक आला होता.

दैनिक गोमन्तक

दक्षिण भारतातील केरळ (kerala) राज्यात 30 जानेवारी 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. या धोकादायक विषाणूच्या संसर्गामुळे 20 वर्षाची मुलगी बळी पडली, जी 25 जानेवारी 2020 रोजी चीनच्या वुहान शहरातून परतली होती. वुहान येथे कोरोना विषाणूचा (Corona) पहिला रुग्ण आढळला होता. पहिली कोरोना रुग्ण वुहानमध्ये औषधांचा अभ्यास करते आणि तिला भविष्यात डॉक्टर (Doctor) बनायचे आहे. तिने आता वुहानला परत जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने सरकारला मदतीची हाक दिली आहे.

तिचे वडील म्हणाले, सध्या कोरोनाचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. यामुळे माझ्या मुलीला वुहानला जाऊन तिचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तिचे वडील सांगतात की सांगतात की त्यांच्या मुलीला भूतकाळ विसरून तिच्या करिअरवर (Career) लक्ष केंद्रित करायचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती ऑनलाईन (Online) अभ्यास करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिने एमबीबीएचा (MBBS) अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मात्र आता तिला विद्यापीठाच्या नियमांनुसार 52 आठवड्याच्या इंटर्नशिप कोर्स (Internship Course) पूर्ण करायचा आहे.

भारतातील पहिल्या रुग्णावर त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये सुमारे तीन आठवडे उपचार झाले आणि 20 फेब्रुवारी 2020 रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला. ती कोरोना आजारातून बारी झाली होती पण दिड वर्षानंतर ती पुन्हा कोरोनाच्या विळख्यात आली होती. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची (Corona) पुन्हा लागण होणे हि पहिलीच घटना नाही. देशात आणि जगात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जेव्हा कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाली.

भारतात (India) कोरोना विषाणूमुळे 12 मार्च 2020 रोजी पहिला मृत्यू कर्नाटकातील (Karnataka) कलबुर्गी झाला. त्यांनतर एक 76 वर्षीय व्यक्ती सौदी अरेबियातून भारतात पातळी होती. सौदी अरेबियातून परतल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि न्यूमोनिया होता. 6 मार्च रोजी स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्या घरी उपचार केले पण तब्येत अधिक बिघडल्याने त्या व्यक्तीला 9 मार्च रोजी कलबुर्गी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक तपासणीला त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. 10 मार्च रोजी त्या व्यक्तीचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT