Finance Minister Sitharaman Dainik Gomantak
देश

Sitharaman On ED: 'ईडी' ही स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी स्वतंत्र संस्था

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले 'ईडी'च्या कारवायांचे समर्थन; राजकीय हेतूने वापर होत नसल्याचे स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Sitharaman On ED: देशातील राजकीय विरोधकांविरोधात सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) माध्यमातून जाणीवपुर्वक कारवाया करून त्रास दिला जात असल्याची टीका विरोधकांकडून गेल्या काही काळात वारंवार होत आहे. तथापि, आता स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच ईडी च्या कारवायांचे समर्थन केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अमेरिका दौऱ्यावर असून तिथे नुकतेच त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वतःचे निर्णय घेण्यासाठी पुर्णतः स्वतंत्र आहे, ती एक स्वतंत्र संस्था आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले.तपास यंत्रणांचा राजकीय दृष्ट्या वापर केला जात असल्याचे त्यांनी साफ नाकारले. तसेच ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईचे समर्थनही केले.

ईडी आणि प्राप्तीकर विभागाविषयीच्या प्रश्नावर सीतारामन म्हणाल्या की, ईडी जेव्हा एखाद्या प्रकरणात लक्ष घालते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, त्या केसचा तपास आधीच इतर कुठलीतरी एजन्सी करत आहे. मग ती संस्था सीबीआय असेल किंवा इतर कुठली एजन्सी. पण राजकीय नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य नेहमी ईडीच ठरते. ईडी कधीही गुन्ह्याच्या घटनास्थळी पहिल्यांदा जात नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. ईडी जेव्हा कुठे जाते तेव्हा जप्त केलेले पैसे, दागिने आणि सोने यामुळे त्यांना प्रसारमाध्यमांत चांगले कव्हरेज मिळते, असे त्यांनी सांगितले.

सीतारामन म्हणाल्या, आम्ही जी 20 च्या नेत्यांशी चर्चा केली आहे. यात विविध आव्हानांवरही चर्चा झाली आहे. इंडोनेशिया कठिण काळातून गेला आहे. जेव्हा आव्हाने खूप असतात तेव्हा सर्व सदस्यांनी मिळून काम करावे लागेल.

दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालपास यांची भेट घेतली. भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत तसेच भारतातील डिजिटाइजेशनबाबतही उभयतांत चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT