Bihar News Dainik Gomantak
देश

Bihar: बिहारमध्ये संपूर्ण कुटुंब जिवंत जाळले, पती, पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू; झोपेत असताना घराला लागली आग

Bihar News: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेगुसरायमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एकाच कुटुंबातील चार जण जिवंत जळाले.

Manish Jadhav

Bihar News: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेगुसरायमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एकाच कुटुंबातील चार जण जिवंत जळाले. ज्यात पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण कुटुंब जिवंत जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना बछवारा पोलिस स्टेशन हद्दीतील अरवा पंचायतीच्या नवतोलिया गावातली आहे. घटनेच्या वेळी संपूर्ण कुटुंब एका गच्चीत झोपले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका गर्भवती महिलेसह एकाच कुटुंबातील एकूण चार जण जिवंत जळून खाक झाले. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. सर्वजण घरात झोपले होते. मृतांमध्ये अरवा नया टोल वॉर्ड क्रमांक 9 येथील रहिवासी राम कुमार पासवान यांचा मुलगा 32 वर्षीय नीरज पासवान, त्यांची 30 वर्षीय पत्नी कविता देवी आणि 5 वर्षांचा मुलगा लव आणि 3 वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास जेवण करुन सर्वजण एकाच घरात झोपल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दुसरीकडे, रात्री 9.45 च्या सुमारास त्यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळातच संपूर्ण घराला आग लागली आणि घरातील सर्व लोक जिवंत जळून खाक झाले. मृत कविता देवी 8 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, मृत नीरज पासवान हा गावात राहत होता आणि मोलमजुरी करायचा. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी सर्व मृतांचे मृतदेह राखेच्या ढिगाऱ्यातून पोलिस प्रशासनाने बाहेर काढले. घटनास्थळी, एसडीएम राकेश कुमार, तेघरा डीएसपी डॉ रवींद्र मोहन प्रसाद, पोलिस स्टेशनचे प्रमुख अजित कुमार, बीडीओ अभिषेक राज, सीओ दीपक कुमार या अधिकाऱ्यांचे पथक घटनेचा तपास करण्यात व्यस्त होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT