Freya Davies Retirement Dainik Gomantak
देश

Cricketer Retirement: क्रिकेटला अलविदा! वकील होण्यासाठी 'या' स्टार खेळाडूनं घेतला निवृत्तीचा निर्णय, क्रीडाविश्वात खळबळ

Freya Davies Retirement: इंग्लंड क्रिकेट संघाकडून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडची महिला वेगवान गोलंदाज इवा हेन्सनने वयाच्या २९ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

इंग्लंड क्रिकेट संघाकडून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडच्या महिला वेगवान गोलंदाज फ्रेया डेव्हिसने वयाच्या २९ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तिची १५ वर्षांची यशस्वी क्रिकेट कारकीर्द आता संपली आहे. डेव्हिसने वकील बनण्यासाठी हा निर्णय घेतला असून ती आता प्रशिक्षणार्थी सॉलिसिटर म्हणून नवीन करिअरला सुरुवात करणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

मार्च २०१९ मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याद्वारे फ्रेयाने इंग्लंडसाठी पदार्पण केले. तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला. २०१९ ते २०२३ या काळात तिने इंग्लंडकडून एकूण ३५ सामने खेळून ३३ विकेट्स घेतल्या, ज्यात चार विकेट्सचा पराक्रमही सामील आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तिच्या निवृत्तीबद्दल कौतुक व्यक्त करत ट्विट केले, "इंग्लंडसाठी ३५ सामने खेळणाऱ्या फ्रेया डेव्हिसचे अभिनंदन. ती आता क्रिकेट सोडून सॉलिसिटर बनत आहे."

देशांतर्गत क्रिकेटमधील दीर्घ प्रवास

डेव्हिसने वयाच्या १४ व्या वर्षी ससेक्स संघातून कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे तिने वेस्टर्न स्टॉर्म, साउथ ईस्ट स्टार्स, लंडन स्पिरिट, वेल्श फायर, सदर्न व्हायपर्स आणि हॅम्पशायर या संघांचे प्रतिनिधित्व केले.

  • २०१३ मध्ये ससेक्सला काउंटी चॅम्पियनशिप जिंकून देण्यात तिचा मोलाचा वाटा होता.

  • २०१९ मध्ये तिला महिला क्रिकेट सुपर लीगमधील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले, त्या हंगामात तिने १९ विकेट्स घेतल्या.

  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने ८६ सामने खेळले आणि महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.

तिचा शेवटचा सामना २१ सप्टेंबर २०२५ रोजी रोझ बाउल येथे हॅम्पशायर विरुद्ध लँकेशायर यांच्यातील एकदिवसीय कप फायनल होता. हॅम्पशायर उपविजेता ठरला, पण डेव्हिसने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. तिने १४ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या, तर उपांत्य फेरीत सरेविरुद्ध ९.५ षटकांत ३९ धावा देत ४ बळी घेतले. महिला हंड्रेड स्पर्धेतही तिची कामगिरी उल्लेखनीय राहिली, जिथे तिने ३७ सामन्यांत ३६ बळी घेतले.

क्रिकेटसोबतच फ्रेया डेव्हिसने अभ्यासालाही प्राधान्य दिले. तिने कायदेशीर सराव अभ्यासक्रम (एलपीसी) आणि एलएलएम पदवी पूर्ण केली. निवृत्तीची घोषणा करताना डेव्हिस म्हणाली – "क्रिकेटमधून मला खूप काही शिकायला मिळालं. पण आता माझ्या जीवनातील नवा टप्पा सुरू करण्याची वेळ आली आहे. वकील होण्याचे माझे स्वप्न आहे आणि मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terror Attack: 'लश्कर' आणि 'जैश'चा भयानक कट! काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मोठ्या हल्ल्याचा डाव; गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर

Liquor Seized In Sindhudurg: नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कणकवलीत 7 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; गुजरातच्या दोघांवर गुन्हा दाखल

Abhinav Tejrana: तेजराणाची 'तेजस्वी' कामगिरी! रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 651 धावा; IPL संघ 'या' खेळाडूवर डाव लावणार?

अग्रलेख; 'राजा जानी' ते 'चुपके चुपके'चा प्रोफेसर! धर्मेंद्रच्या निधनाने बॉलिवूडने गमावला एक अष्टपैलू नट

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

SCROLL FOR NEXT