AI Fake Injury Photo Dainik Gomantak
देश

Viral Post: कर्मचाऱ्याचा 'AI जुगाड' चर्चेत! सुट्टी मिळवण्यासाठी पठ्ठ्यांनं लढवली अनोखी शक्कल; खुलाशानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

AI Fake Injury Photo: एका जुगाडू कर्मचाऱ्याने आपल्या हातावर AI च्या मदतीने दुखापती झाल्याची नकली खूण दाखवली. त्यानंतर या दुखापतीचा फोटो पाठवून ऑफिसमधून मेडिकल सुट्टी सहज मिळवली.

Manish Jadhav

AI Fake Injury Photo: काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक किस्सा खूप गाजला होता, ज्यात एका व्यक्तीने फूड वितरण कंपनीकडून रिफंड मिळवण्यासाठी AI चा वापर करुन एडिट केलेले अंड्यांचे फोटो पाठवले होते. त्याच धर्तीवर आता आणखी एक नवा आणि लक्षवेधी प्रकार समोर आला आहे. मात्र, हा प्रकार खाण्यापिण्याशी संबंधित नसून ऑफिसमधून सुट्ट्या मिळवण्यासाठी वापरल्या गेलेल्या एका अनोख्या जुगाडाचा आहे.

एका कर्मचाऱ्याने आपल्या हातावर AIच्या मदतीने दुखापत झाल्याचे दाखवले. त्यानंतर या दुखापतीचा फोटो पाठवून ऑफिसमधून सहजरित्या सुट्टी मिळवली. या दुखापतीचा फोटो इतका रियल वाटत होता की, तो AI ने तयार केला, याचा कोणालाही साधा संशयही आला नाही. हा संपूर्ण प्रकार 'एक्स'वर चांगलाच व्हायरल झाला, ज्यानंतर AIच्या गैरवापराबद्दल गंभीर चर्चा सुरु झाली.

कर्मचाऱ्याचा 'AI जुगाड' काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, या कर्मचाऱ्याने सुट्टी मिळवण्यासाठी अत्यंत सोपी पण धोकादायक युक्ती वापरली. कर्मचाऱ्याने सर्वात आधी आपल्या हाताचा एक साधा फोटो काढला, ज्यावर कोणत्याही प्रकारची जखम किंवा सूज नव्हती. त्यानंतर त्याने Gemini Nano सारख्या प्रगत AI टूलमध्ये फक्त ‘Apply an injury on my hand’ असे टाइप केले.

त्यानंतर काही क्षणातच AI ने त्याच्या हातावर खोल, ताजी आणि वेदनादायक वाटणारी जखम असल्याचा फोटो तयार केला. ही दुखापत इतकी अचूक होती की, तो फोटो नकली आहे, हे सिद्ध करणे मानवी डोळ्यांनाही कठीण गेले. कर्मचाऱ्याने कोणतीही शहानिशा न करता हा AI-निर्मित दुखापतीचा फोटो ऑफिसच्या एचआर पाठवला आणि मोटारसायकलवरुन पडून अपघात झाल्याचा दावा केला. एचआरनेही कोणतीही चौकशी न करता त्याची सुट्टी मंजूर केली.

असली आणि नकलीमधील फरक ओळखणे मोठे आव्हान

या घटनेच्या सोशल मीडियावरील खुलाशानंतर लोक AI च्या झपाट्याने वाढत चाललेल्या संभाव्य गैरवापरावर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करु लागले. अनेक यूजर्संनी सांगितले की, आता AI जनरेटेड फोटो इतके वास्तववादी वाटू लागले आहेत की, असली आणि नकली यांच्यातील फरक ओळखणे हे तांत्रिकदृष्ट्या एक मोठे आव्हानात्मक काम बनले. काही तज्ज्ञांनी चेतावणी दिली की, तंत्रज्ञानाने भ्रम निर्माण करण्याची मर्यादा ओलांडली असल्यामुळे केवळ डोळ्यांवर अवलंबून राहून निर्णय घेणे हे भविष्यात जोखमीचे सिद्ध होऊ शकते.

या घटनेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी चर्चा सुरु झाली की, भविष्यात अशा AI ने बनवलेले खोटे फोटो आणि खऱ्या फोटोंची ओळख कशी करायची? तसेच, या धोक्यांपासून वाचण्यासाठी नवीन सुरक्षा मानके आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे का? या प्रश्नांवर आता कंपन्या, एचआर विभाग आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांना विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक; अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत, मद्यधुंद चालकाचा हैदोस!

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT