FIA India Day Celebration New York 2026 Dainik Gomantak
देश

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

FIA India Day Celebration New York 2026: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध 'अँपायर स्टेट बिल्डींग' भारतीय राष्ट्रध्वजाच्या केसरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांनी उजळून निघाली.

Manish Jadhav

Empire State Building Illuminated In Indian Tricolor: भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाची पर्वणी तसेच अमेरिकेच्या 250व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध 'अँपायर स्टेट बिल्डींग' भारतीय राष्ट्रध्वजाच्या केसरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांनी उजळून निघाली. 'फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन'च्या वतीने आयोजित 44व्या वार्षिक 'इंडिया डे' सोहळ्याअंतर्गत या विशेष दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

यंदाच्या या सोहळ्याची संकल्पना 'हार्मनी इन हेरिटेज' अशी ठेवण्यात आली होती. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या दोन महान देशांच्या अनोख्या मैत्रीचा हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. तसेच, कलाश्री स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी सादर केलेल्या मनमोहक सांस्कृतिक नृत्याने या कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात झाली.

एफआयएचे अध्यक्ष अंकुर वैद्य यांनी या प्रसंगी आनंद व्यक्त करताना सांगितले की, अमेरिकेचे 250वे वर्ष आणि भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन एकत्र साजरा करणे हा अतिशय अभिमानास्पद क्षण आहे. एडिसन शहराचे महापौर सॅम जोशी यांनी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारतीय-अमेरिकन समुदायाने आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाचा गौरव केला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे कलाकार.

मालिकेतील अभिनेते दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी, बलविंदर सिंग आणि नितेश भालुनी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अँपायर स्टेट बिल्डींगला तिरंग्याच्या रंगात उजळवणारा मुख्य लिव्हर खेचण्यात आला. हा थरारक आणि नयनरम्य क्षण पाहण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते, तर डिजिटल माध्यमांद्वारे जगभरातील लाखो प्रेक्षकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमानंतर उपस्थितांनी अँपायर स्टेट बिल्डींगच्या व्ह्यूइंग डेकवरुन न्यूयॉर्क शहराच्या सुंदर दृश्यांचा मनमुराद आनंद लुटला. एफआयए संस्था गेली अनेक दशके अमेरिकेत भारतीय संस्कृतीचा वारसा जपत दोन्ही देशांतील नागरिकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT