El Nino conditions and weather pattern changes Dainik Gomantak
देश

El Nino: 'एल निनो' नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचणार; 'सीपीसी'चा अंदाज; मार्चमध्ये तीव्रता कमी होण्याची शक्यता

NOAA Climate Prediction Center: मॉन्सूनचा पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) त्याच्या उत्तरेला सरकला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पुणे: प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची तीव्रता सातत्याने वाढत असून, येत्या नोव्हेंबरमध्ये ‘एल निनो’ सर्वोच्च पातळीवर पोचण्याचा अंदाज अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) वर्तविला आहे. पुढील वर्षीच्या वसंत ऋतूच्या प्रारंभी ‘एल निनो’ सक्रिय राहण्याची शक्यता वाढली असली, तरी मार्चमध्ये त्याची तीव्रता कमी होणार असल्याचे ‘सीपीसी’ने म्हटले आहे.

‘सीपीसी’ने ‘एल निनो’च्या सद्यस्थिती अहवालासह आगामी नऊ महिन्यांचा अंदाज नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या बहुतांश क्षेत्राचे तापमान सरासरीपेक्षा एक अंश किंवा त्यापेक्षा जास्त नोंदले जात आहे. महासागराच्या पूर्व भागात हे तापमान सरासरीपेक्षा २.७ अंशांनी जास्त आहे.

मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाखाली उबदार प्रवाह तयार झाले असून, जमिनीलगतच्या वातावरणात पश्चिमेकडून वाहणाऱ्या आणि वातावरणाच्या वरच्या थरात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची गती वाढली आहे. पूर्व प्रशांत महासागरात ऊर्ध्वगामी वाऱ्यांसह ढगांची निर्मिती होत असून, इंडोनेशियाजवळ ती निर्मिती मंदावली आहे. एकत्रितपणे ही स्थिती ‘एल निनो’ची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट करते.

आणखी आठवडाभर कोरडे हवामान

मॉन्सूनचा पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) त्याच्या उत्तरेला सरकला आहे. मॅडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आहे. त्यामुळे आठवडाभर राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २२ ते २४ जुलै दरम्यान कोकणासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची शक्यता असल्याचे ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीम मॉडेलवरून दिसून येत आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ‘एल निनो’ची तीव्रता अतितीव्र स्वरूपाची होणार आहे. नोव्हेंबरमध्ये ‘एल निनो’ सर्वोच्च पातळीवर (सरासरीपेक्षा २ ते २.५ अंश जास्त तापमान) पोहचू शकतो.एल निनो’ची तीव्रता नोव्हेंबरनंतर कमी होण्याचा अंदाज विविध मॉडेलमधून व्यक्त होत आहे.यंदाचा ‘एल निनो’ पुढील वर्षीच्या वसंत ऋतूच्या सुरुवातीपर्यंत (मार्च २०२७) सक्रिय राहण्याची शक्यता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT