Directorate of Enforcement Raid Dainik Gomantak
देश

वॉशिंग मशीनमध्ये सापडला खजिना... ईडीच्या छापेमारीत 2.54 कोटी रुपये जप्त

Directorate of Enforcement Raid: भारताबाहेर विदेशी चलन मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात काही संस्थांचा हात असल्याची विश्वसनीय माहिती ईडीला मिळाली होती.

Manish Jadhav

Directorate of Enforcement Raid: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. भारताबाहेर विदेशी चलन मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात काही संस्थांचा हात असल्याची विश्वसनीय माहिती ईडीला मिळाली होती. त्याआधारे ईडीच्या टीमने काही कंपन्यांवर छापे टाकून या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान 2.54 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून त्यापैकी एकूण रकमेचा मोठा भाग वॉशिंग मशीनमध्ये लपवण्यात आला होता. दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे ही छापेमारी करण्यात आली.

दरम्यान, ED च्या टीमने FEMA, 1999 च्या तरतुदींनुसार मेसर्स कॅप्रिकॉर्न शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांची चौकशी केली. यासोबतच त्यांच्या संबंधित संस्था मे. लक्ष्मीटन मेरीटाईम, मे. हिंदुस्तान इंटरनॅशनल, मे. राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, मे. स्टीवर्ट अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मे. भाग्यनगर लिमिटेड, मे. विनायक स्टील्स लिमिटेड, मे. वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक-पाटर्नर संदीप गर्ग, विनोद केडिया यांचा शोध घेण्यात आला.

1800 कोटींची संशयास्पद रक्कम सिंगापूरला पाठवली

ED ला त्यांच्या तपासात आढळले की, 1800 कोटी रुपयांची संशयास्पद रक्कम M/s Galaxy Shipping & Logistics Pvt Ltd आणि Horizon Shipping & Logistics Pvt Ltd. या दोन्ही परदेशी संस्थांना पाठवण्यात आली.

बनावट आयात आणि मालवाहतुकीच्या नावाखाली होणारे व्यवहार

तपासादरम्यान, असे आढळून आले की मेसर्स कॅप्रिकॉर्न शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स लक्ष्मीटन मेरीटाईम आणि त्यांच्या सहयोगींनी बनावट मालवाहतूक सेवा आणि आयातीच्या नावाखाली सिंगापूरस्थित संस्थांना 1,800 कोटी रुपये पाठवले. यासाठी मेसर्स नेहा मेटल्स, मेसर्स अमित स्टील ट्रेडर्स, मेसर्स ट्रिपल एम मेटल अँड अलॉयज, मेसर्स एचएमएस मेटल्स इत्यादी बनावट संस्थांच्या मदतीने गुंतागुंतीचे व्यवहार दाखवण्यात आले.

कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली

तपासादरम्यान 2.54 कोटी रुपये जप्त करण्यात आले, ज्याबाबत आरोपी कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. या रकमेचा काही भाग वॉशिंग मशीनमध्ये लपवण्यात आला होता, तो जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, ऑपरेशनदरम्यान, विविध गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे देखील सापडली, जी जप्त करण्यात आली आहेत. ईडीच्या टीमने संबंधित संस्थांची 47 बँक खातीही गोठवली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT