Mall Dainik Gomantak
देश

Benami Property: बेनामी संपत्तीप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, नोएडातील हा प्रसिद्ध मॉल घेतला ताब्यात

ED News: ED ने नोएडा सेक्टर-38A मध्ये बांधलेल्या गार्डन गॅलेरिया मॉलचा 40 टक्के भाग ताब्यात घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

ED Action Against Benami Property: बेनामी संपत्तीप्रकरणी ईडीने युनिटेक ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. ED ने नोएडा सेक्टर-38A मध्ये बांधलेल्या गार्डन गॅलेरिया मॉलचा 40 टक्के भाग ताब्यात घेतला आहे. या जप्त केलेल्या जागेचे क्षेत्रफळ 1 लाख 40 हजार चौरस मीटर आहे. त्याचबरोबर या जमिनीची बाजार किंमत 65 कोटी 32 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत युनिटेक समूहाची 1132.55 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

विदेशी कंपनीत बेनामी मालमत्ता गुंतवली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिटेक ग्रुपने 2007-08 मध्ये विदेशी कंपनीत बेनामी मालमत्ता गुंतवली होती. त्या वर्षी समूहाने (Unitech Group) विदेशी कंपनीत $8 दशलक्ष गुंतवणूक (Investment) केली. यासोबतच नोएडातील सर्वात महागड्या भागात गार्डन गॅलेरिया मॉलही सुरु करण्यात आला आहे. ईडीच्या (ED) तपासात आतापर्यंत 6500 कोटींच्या व्यवहारांचे पुरावे मिळाले आहेत. तर एजन्सीचे अधिकारी उर्वरित पुरावे मिळवण्यात गुंतले आहेत.

युनिटेकच्या प्रवर्तकांना अटक करण्यात आली

बेनामी मालमत्तेच्या या प्रकरणात युनिटेकचे प्रवर्तक संजय चंद्रा, अजय चंद्रा, रमेश चंद्रा, प्रीती चंद्रा आणि राजेश मलिक यांना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. दिल्लीच्या तिहार तुरुंगात लक्झरी सुविधांचा पुरावा मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने युनिटेकच्या प्रवर्तकांना मुंबई तुरुंगात हलवले. तेव्हापासून सर्व आरोपी तिथेच बंद असून तुरुंगवास भोगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT