Jammu Kashmir Earthquake Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir Earthquake: जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भुकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 3.6 तीव्रता

जम्मू-काश्मीरमध्ये 3.6 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

Earthquake Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधील आज सकाळी भुकेपाचे धक्के जाणवले. सकाळी 5 च्या सुमारास कटरापासून 97 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले.

राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 नोंदवण्यात आली असली तरी या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. 

आदल्या दिवशी देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. काल म्हणजेच 16 फेब्रुवारी मेघालयात 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार, सकाळी 9.26 वाजता भूकंप झाला आणि त्याचा केंद्रबिंदू पूर्व खासी हिल्समध्ये 46 किमी खोलीवर होता.

  • ... आणि हादरे कुठे जाणवले?

शिलाँग, पूर्व खासी हिल्स जिल्हा मुख्यालय, रि-भोई आणि आसाममधील कामरूप महानगर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे तात्काळ जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 

गेल्या रविवारी आणि सोमवारी, मध्य आसाममधील होजई जवळ त्यांचे केंद्रबिंदू असलेले अनुक्रमे 4 आणि 3.2 तीव्रतेचे दोन भूकंप नोंदवले गेले. ईशान्य प्रदेश हा उच्च भूकंपाच्या क्षेत्रात येतो, जेथे भूकंपाचे धक्के अनेकदा जाणवतात.

  • दिल्ली उच्च न्यायालयाने भूकंपाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे


तर तुर्की, फिलिपाइन्स, सीरिया, नेपाळमधील भूकंपांची तीव्रता पाहता देशाच्या न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रीय राजधानीत भूकंपाच्या तयारीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी सांगितले की, प्रत्येकजण आपल्या जीवाच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहे. या याचिकेत काहीही विकृत नसून अधिकाऱ्यांनाही परिस्थितीची तितकीच जाणीव असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT