Air India Dainik Gomantak
देश

Air India च्या विमानात मद्यधुंद व्यक्तीचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केली लघुशंका

एअर इंडियाच्या विमानातील एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

एअर इंडियाच्या विमानात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका मद्यधुंद व्यक्तीने महिला प्रवाशावर लघुशंका केली आहे. ही महिला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती.

त्यानंतर पीडित महिलेसोबत बसलेल्या एका व्यक्तीने तिच्या अंगावर लघुशंका केली. आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडियाच्या (Air India) बिझनेस क्लासमध्ये एका महिलेच्या (Women) अंगावर लघुशंका केल्याची घटना 26 नोव्हेंबरची आहे. ही पीडित महिला न्यूयॉर्कहून दिल्लीला जात होती. आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली असून आरोपी पुरुष प्रवाशाला 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे प्रकरण आता सरकारी समितीच्या अखत्यारीत असून निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

SCROLL FOR NEXT