Driver Dainik Gomantak
देश

चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका; 60 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवणारा ठरला 'देवदूत'

Odisha: ओडिशातील बालासोर येथे बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Odisha: ओडिशातील बालासोर येथे बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीनेच योग्य वेळी बस थांबवून सुमारे 60 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले. बालासोर जिल्ह्यातील पातापूर चक येथे मंगळवारी ही घटना घडली.

बस चालवताना हृदयविकाराचा झटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी बालासोरमध्ये बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, मात्र त्याने वेळीच बस थांबवून 60 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील पातापूर चक येथे ही घटना घडली.

बस पंचलिंगेश्वर मंदिराकडे जात होती

पश्चिम बंगालमधून पर्यटकांना घेऊन जाणारी बस जिल्ह्यातील पंचलिंगेश्वर मंदिराकडे जात असताना चालकाला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. वेदना जाणवू लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी स्थानिक लोकांना बोलावून घेत शेख अख्तर नावाच्या चालकाला जवळच्या निलगिरी उपविभागीय रुग्णालयात नेले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, रुग्णालयातील डॉक्टरांनी चालकाला मृत घोषित केले. अमित दास या प्रवाशाने सांगितले की, ड्रायव्हर वाटेत अचानक आजारी पडला आणि त्याने बस थांबवली. गाडी रस्त्याच्या एका बाजूला थांबताच तो बेशुद्ध झाला. स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी प्रवाशांनी आणि लोकांनी बसचालकाचे भरभरुन कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT