Har Ghar Tiranga Campaign Dainik Gomantak
देश

Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवताना काय काळजी घ्याल?

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा 15 ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' (India's Independence Day) सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रभक्तीचे प्रतिक म्हणून देशात हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. घरोघरी तिरंगा' लावताना काय काळजी घ्यावी, तिरंग्याचा मान राखला जावा, यासाठी काय करावे याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

तिरंगा फडकवताना या गोष्टी लक्षात ठेवा

नागरिकांना 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावता येणार आहे.

ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

तिरंगा ध्वजाचा आकार आयताकार असावा, झेंड्याची लांबी रुंदीचे प्रमाण - 3*2 असावे.

कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादीपासून बनविलेल्या आयताकार असावा.

अर्धा तुटलेला, फाटलेला, मळलेला राष्ट्र ध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये.

कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकावल्यास ध्वज संहिता पाळावी. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा.

घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.

राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नये. ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा.

तिरंगा फडकवताना या गोष्टी करू नयेत

प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये.

फाटलेला अथवा चुरगाळलेला ध्वज लावू नये.

ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा काठीच्या टोकावर फुले किंवा हार घालू नये.

अन्य कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा.

ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये.

ध्वज फाटेल अशा पद्धतीने तो फडकवू नये, अथवा बांधू नये. ध्वज मलीन होईल अशा पद्धतीने वापरू नये किंवा ठेवू नये.

ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत

राष्ट्रध्वजाचा उपयोग पडद्यासाठी किंवा अन्य कारणासाठी करू नये.

अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये. तो सन्मानाने जतन करावा. तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT