dhl cargo plane breaks in two during emergency landing costa rica Dainik Gomantak
देश

लँडिंग दरम्यान विमानाचे झाले दोन तुकडे, व्हिडीओ व्हायरल

विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, यादरम्यान झाले दोन तुकडे

दैनिक गोमन्तक

मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका या देशात गुरुवारी एक भीषण विमान अपघात (Accident) झाला. यामध्ये इमर्जन्सी लँडिंग करताना विमान मध्यभागी तुटल्याने त्याचे दोन तुकडे झाले. या विमान अपघाताची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. (dhl cargo plane breaks in two during emergency landing costa rica)

मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टा रिकामधील जुआन सांता मारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी हा अपघात झाला. वास्तविक, DHL च्या मालवाहू विमानात काही यांत्रिक समस्या होती, त्यानंतर त्याचे जुआन सांता मारिया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Landing) करण्यात आले, यादरम्यान त्याचे दोन तुकडे झाले.

मालवाहू विमानाचे दोन तुकडे

ते प्रवासी विमान नसून मालवाहू विमान होते, ही दिलासादायक बाब होती. मालवाहू विमानात प्रवासी प्रवास करत नाहीत. इकडून तिकडे वस्तू नेल्या जातात. कार्गो विमानात फक्त दोन क्रू मेंबर्स होते, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. वैमानिकालाही कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.

जर्मन कंपनी DHL चे हे पिवळ्या रंगाचे विमान जमिनीवर आले तेव्हा त्यातून धूर निघत होता. असे सांगितले जात आहे की ते धावपट्टीवरून घसरले आणि नंतर विमानाच्या मागील चाकाजवळ दोन तुकडे झाले.

गुरुवारी सकाळी 10.30 वाजता हा अपघात झाला. बोइंग-757 विमानाने सांता मारिया विमानतळावरून उड्डाण केले. अपघातानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT