Death  Dainik Gomantak
देश

Goa Crime: पत्नीने दुसरे लग्न केलं अन् पतीला डिप्रेशन आलं; झारखंडच्या मजुराने गोव्यात उचलले टोकाचे पाऊल

Goa Crime News: हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरेशचा मृतदेह गोव्याहून रांचीला नेण्यात आला.

Pramod Yadav

गोव्यात कामाला असणाऱ्या झारखंड येथील मजुराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीने दुसरे लग्न केले आणि मानसिक धक्का बसल्यामुळे २५ वर्षे मजुराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (१७ जानेवारी) ही घटना घडली.

सुरेश मरांडी (वय २५, रा. लिट्टीपार, रांची) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश गेल्या तीन वर्षांपासून पत्नीसह गोव्यात मजुरीचे काम करत होता. मात्र वर्षभरापूर्वी सुरेशची पत्नी गोव्याहून आई-वडिलांच्या घरी परतली आणि दुसरे लग्न केले. यामुळे सुरेश नेहमी चिंतेत असायचा आणि तो डिप्रेशनमध्ये गेला.

गेल्या शुक्रवारी त्याने दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मजुरांनी त्याच्या घरच्यांना माहिती दिली. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरेशचा मृतदेह गोव्याहून रांचीला नेण्यात आला. रांचीहून रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह मंगळवारी रात्री घरी दाखल झाला.

लिट्टीपाराचे आमदार हेमलाल मुर्मू यांनी सुरेशच्या घरच्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदारांनी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

Goa Shetkari Aadhar Nidhi: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत, मुख्यमंत्री डॉ. सावंत; 4 कोटी 10 लाखांची नुकसान भरपाई

Goa POP Idol Ban: 'पीओपी' मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई! गेल्या वर्षी 27 गुन्हे; 20 टक्क्यांहून अधिक 'पीओपी'वर बंदी

खरी कुजबुज: पालेकरांचा ‘आघाडी’ला हात की खोडा?

Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT