Delhi explosion, Red Fort blast, Delhi car bomb Dainik Gomantak
देश

Delhi Blast: कारमधील प्रवाशांना 'स्फोटाची' कल्पना होती? चौकशी सुरू; भारत- नेपाळ सीमेवर सावधगिरीचा इशारा, बंदोबस्तात वाढ

Delhi Car Blast News: या स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याने शेजारील आठ ते दहा मोटारींनी देखील पेट घेतला होता. या स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याने मृतांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.

गोमन्तक डिजिटल टीम

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली भीषण स्फोटाने हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याशेजारील परिसरात उभ्या असलेल्या मोटारीत स्फोट होऊन तेराजण मृत्युमुखी पडले असून अन्य ३० जण जखमी झाले आहेत.

या स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याने शेजारील आठ ते दहा मोटारींनी देखील पेट घेतला होता. या स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याने मृतांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. हे वृत्त समजताच राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) आणि न्यायवैद्यक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या दुर्घटनेचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदणी चौकात वर्दळीच्या वेळी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास लाल किल्ल्याशेजारच्या मेट्रो स्थानक गेट क्रमांक- १ समोर काश्मिरी गेटकडून दर्यागंजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारीत अतिशय तीव्र स्फोट झाला.

हा स्फोट इतका प्रचंड होता की त्यामुळे दीड किलोमीटरचा परिसर हादरला. स्फोट झालेली मोटार आणि तिच्या शेजारी असलेले लोक हवेत भिरकावले गेले. क्षणार्धात पाच-सहा मोटारींना आग लागली. या स्फोटाचे वृत्त समजताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या जैन मंदिर आणि गौरीशंकर मंदिरांनाही या स्फोटाचे हादरे बसले आणि त्याच्या काचा फुटल्या. एका जुन्या इमारतीची भिंत कोसळली आणि अनेक जुनी घरे हादरली.

लोक पळत सुटले

या स्फोटामुळे तीनशे मीटरपर्यंतची जमीन हादरली. प्रत्यक्षदर्शींच्या मते लागोपाठच्या दोन तीव्र स्फोटांनंतर पाच ते सहा वाहनांना आग लागली. या भागात वावरत असलेले हजारो लोक स्फोटानंतर पळत सुटले आणि संपूर्ण परिसरात एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. या घटनेनंतर राजधानी दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाना यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून सर्वत्र सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. संपूर्ण दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून लाल किल्ल्याच्या परिसरातील चांदणी चौक, खारी बावली, लाहोरी गेट बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. याच परिसरातील जामा मशीद, गौरीशंकर मंदिर, जैन मंदिर ही धार्मिक स्थळे, सर्व दुकाने बंद करण्यात आली.

मार्केट बंद, बंदोबस्तात वाढ

कॅनॉट प्लेसपासून कमलानगर, लाजपत मार्केट, सरोजिनी मार्केट, करोलबाग मार्केट, गांधीनगर, लक्ष्मीनगर आणि लाल क्वार्टर मार्केट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील सर्व रेल्वेस्थानके, बस स्थानके, मेट्रो.

स्फोटानंतर

गृहमंत्री अमित शहांची पोलिस आयुक्तांशी चर्चा

आयबी प्रमुखांची गृहमंत्र्यांशी चर्चा

उत्तरप्रदेश अन् लगतच्या राज्यांत अलर्ट

पंतप्रधान मोदींकडून घटनेचा आढावा

भारत- नेपाळ सीमेवर सावधगिरीचा इशारा

महाराष्ट्रात महत्त्वाच्या शहरांत बंदोबस्तात वाढ

विरोधकांकडून चौकशीची मागणी

त्यांना कल्पना होती?

या स्फोटाच्या मागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे. चालत्या मोटारीत स्फोट झाल्यामुळे आत बसलेल्या लोकांच्या चिंधड्या उडाल्या. स्फोटके ठेवल्याची प्रवाशांना कल्पना होती काय? याचीही चौकशी सुरू झाली आहे.

दोन हजार ९०० किलो स्फोटके जप्त

सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा एक मोठा कट उधळून लावला आहे. याप्रकरणी आठ संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यात तीन डॉक्टरांचाही समावेश आहे. या कारवाईत सुरक्षा दलांनी तब्बल दोन हजार ९०० किलोग्रॅम एवढी स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. ‘जैशे मोहंमद’ आणि ‘अन्स गझावत उल हिंद’ या दोन संघटना या हल्ल्याच्या सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. काश्मीर, हरियाना आणि उत्तरप्रदेशात हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fiza Shaikh Sanguem: '..उड़ जा बनके आसमान दी परी'! सांगेच्‍या 'फिझा'ची अमेरिकेत चमक; आंतरराष्ट्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती

MS Dhoni UK Police Arrest: क्रिकेट विश्वात खळबळ! एमएस धोनीला अटक? UKमध्ये नेमकं काय घडलं? व्हिडिओ होतोय VIRAL

Bicholim Water Issue: वणवण संपली! साडेतीन दिवसांनंतर डिचोलीत पाणी; गृहिणींचा जीव भांड्यात

Bashudev Bhandari: ..त्याला पोहता येत न्हवते! बेपत्ता 'बाशुदेव'बाबत पोलिसांचा निष्कर्ष; मद्यप्राशन, वजनामुळे संशयास वाव

Horoscope: मनात अनेक प्रश्न आहेत, नेमकं काय करावं समजत नाही? इजिप्शियन ज्योतिषशास्त्रात स्वतः देव देतात उत्तर; वाचा तुमच्या नशिबात काय लिहिलंय!

SCROLL FOR NEXT