Delhi Rain  Dainik Gomantak
देश

Delhi Rain Video: दिल्लीत पावसाने मोडला 41 वर्षांचा विक्रम; केवळ 12 तासांत पडला पूर्ण मान्सूनच्या 15 टक्के पाऊस

Delhi NCR Heavy Rain: मुसळधार पावसामुळे दिल्लीतील उद्याने, अंडरपास, मार्केट आणि अगदी हॉस्पिटल परिसरही पाणी साचल्यामुळे ठप्प झाला आहे.

Ashutosh Masgaunde

Delhi Rain Broke 41 Years Old Record: दिल्ली-एनसीआर (Delhi NCR Heavy Rain) मधील पाऊस यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे. मान्सूनच्या या मूडमुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला आणि रविवारीही सकाळपासून पाऊस सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने दिल्लीकरांच्या नाकी नऊ आणले आहेत.

मान्सूनच्या पावसाने दिल्लीत गेल्या ४१ वर्षांचा विक्रम केला आहे. पावसामुळे शहरातील यंत्रणा कोलमडली असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.

कालपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे दिल्लीतील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
दिल्लीत काल १२६ मिमी पाऊस झाला. मान्सूनच्या एकूण पावसापैकी १५ टक्के पाऊस अवघ्या १२ तासांत झाला. पाणी साचल्याने लोक प्रचंड अस्वस्थ आहेत. आज दिल्लीचे सर्व मंत्री आणि महापौर समस्याग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना रविवारची सुट्टी रद्द करून मदतकार्यासाठी उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत दिल्लीत 153 मिमी पावसाची नोंद झाली, जी 1982 पासून जुलैमधील एका दिवसातील सर्वाधिक आहे.

पावसामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे दिल्ली सरकारही हाय अलर्ट मोडवर आले आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुटी रद्द केली असून, पावसामुळे बाधित झालेल्या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी त्यांना मैदानावर जाण्याचे निर्देश दिले आहेत.

IMD कडून यलो अलर्ट

रविवारी हवामान खात्याने पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत रविवारी सौम्य ते मध्यम स्वरूपाचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे दिल्लीतील उद्याने, अंडरपास, मार्केट आणि अगदी हॉस्पिटल परिसरही पाणी साचल्यामुळे ठप्प झाला आहे. या पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

दिल्लीतील पावसाचे मुख्य कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. याशिवाय मान्सून वाऱ्यांच्या परस्पर क्रियांमुळे वायव्य भारतात मुसळधार पाऊस पडत आहे.

रविवारी सकाळी 8:30 वाजता संपलेल्या 24 तासांत 153 मिमी पावसाची नोंद झाली, जी 25 जुलै 1982 नंतरची सर्वाधिक आहे. 24 तासांचा पाऊस 169.9 मिमी होता, असे हवामान खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्लीप्रमाणेच एनसीआरमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबादमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT