Nupur Sharma News Dainik Gomantak
देश

नुपूर शर्मांना दिल्ली पोलिसांनी दिली सुरक्षा, जीवे मारण्याची मिळाली धमकी

प्रेषित मोहम्मद यांच्यावरील एका टीव्ही चर्चेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांनी संरक्षण दिले आहे.

दैनिक गोमन्तक

प्रेषित मोहम्मद यांच्यावरील एका टीव्ही चर्चेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांनी संरक्षण दिले आहे. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने पोलिसांत देण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. (Delhi Police gives security to Nupur Sharma suspended from BJP)

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.'दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.'

दरम्यान, नुपूर शर्माने एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले, ज्यानंतर गदारोळ निर्माण झाला. एकीकडे भारतातील कानपूरसारख्या शहरात मुस्लिम समाजातील लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर हिंसाचार उसळला. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताला (India) टीकेला सामोरे जावे लागले आहे. अनेक देशांमध्ये ट्विटरवर ही मोहीम चालली. भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली. सौदी अरेबिया, कतार, ओमान, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इराणसह एकूण 15 देशांनी आतापर्यंत या मुद्द्यावर भारतावर आक्षेप घेतला आहे.

शिवाय, अनेक देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून निषेध केला आहे. अरब देशांमध्ये निदर्शने झाल्यानंतरच रविवारी भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित केले. नुपूर शर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा असलेल्या नुपूर शर्मा जेव्हा केजरीवाल यांच्या विरोधात उतरल्या तेव्हापासूनच त्या चर्चेत आल्या होत्या. नंतर त्या राष्ट्रीय प्रवक्त्या बनल्या. मात्र, प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT