Delhi Dainik Gomantak
देश

Delhi: चायनीज मांजाने तरुणाचा कापला गळा, रुग्णालयात झाला मृत्यू

Delhi News: शाहदरा परिसरात रविवारी पुन्हा एकदा एका चायनीज मांजाने तरुणाच्या जीवाची तार कापली.

दैनिक गोमन्तक

Delhi: शाहदरा परिसरात रविवारी पुन्हा एकदा एका चायनीज मांजाने तरुणाच्या जीवाची तार कापली. मानसरोवर पार्क परिसरात स्कूटीवरुन जाणाऱ्या तरुणाचा चायनीज मांजाने गळा कापला. जखमी अवस्थेत त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मानसरोवर पार्क पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, 25 वर्षीय अभिषेक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबासह गल्ली क्रमांक आठमध्ये राहत होता. या कुटुंबात वडील मनोज कुमार, आई सीमा याशिवाय तीन भाऊ आणि एक बहीण आहे. अभिषेक अविवाहित होता. त्याचे बालाजी नावाचे टेंट हाऊस आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अभिषेक काही कामानिमित्त शालिमार गार्डन येथे जात होता. तो घरातून स्कूटीने निघाला होता. घरापासून काही अंतरावर असलेल्या नथू कॉलनी उड्डाणपुलावर तो पोहोचला. यादरम्यान अचानक मांजाने त्याचा गळा कापला.

पतंग उडवणारे शौकीन खबरदारी घेतात

पतंग उडवणाऱ्या शौकिनांनी पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे आवाहन वीज पुरवठा कंपन्यांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवापूर्वी पतंगबाजी सुरक्षिततेने आणि सावधगिरीने करावी, असे सांगण्यात आले होते. ओव्हरहेड विजेच्या तारा आणि खांबापासून दूर राहा. विद्युत तारा आणि खांबांमध्ये अडकलेल्या मेटल लेपित मांजामुळे हॉस्पिटल, जल बोर्ड, दिल्ली (Delhi) मेट्रोसह अत्यावश्यक सेवांचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT