Girl
Girl Twitter/ @SwatiJaiHind
देश

Delhi Crime: धक्कादायक ! प्रेयसीचे 35 तुकडे केले, अन् दररोज…!

दैनिक गोमन्तक

Delhi Crime: दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या करुन मृतदेहाचे तुकडे अनेक भागात फेकले. या तरुणीच्या हत्येप्रकरणी संबंधित आरोपीला तब्बल 5 महिन्यानंतर पकडण्यात आले आहे. तरुणीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन अनेक भागामध्ये फेकल्याचे आरोपीने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने मृत तरुणीचे 35 तुकडे घरामध्ये ठेवले होते. यासाठी तरुणाने नवा फ्रिज घेतला होता. तब्बल 18 दिवस त्याने मृतदेहाचे तुकडे घरात ठेवले होते. आरोपी रात्री दोन वाजता मृत तरुणीच्या शरीराचे तुकडे फेकून देत असे. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत तब्बल 10-15 तुकडे सापडले आहेत.

दरम्यान, मृत तरुणी मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती. तर आरोपी तरुणाने मुंबईमधील मालाड भागात राहणाऱ्या या तरुणीला लग्नाच्या बहाण्याने दिल्लीला येण्यासाठी भाग पाडले होते. तर विकास मदन वॉकर यांनी दिल्लीतील (Delhi) मेहरौली पोलीस ठाण्यात 8 नोव्हेंबर रोजी आपल्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पालघरमध्ये मी माझ्या कुटुंबासमवेत राहतो. माझी मुलगी मुंबईतील (Mumbai) एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती.

दुसरीकडे, याच कॉल सेंटरमध्ये या तरुणाची तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करु लागले. काही कालावधीनंतर ते दोघे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले. मात्र, यासंबंधाची माहिती कुटुंबीयांना कळताच त्यांनी विरोध करायला सुरुवात केली होती. घरच्यांनी विरोध केल्यानंतर मृत तरुणी आणि आरोपी मुंबई सोडून गेले. यानंतर ते दिल्लीतील मेहरौलीच्या छतरपूर भागात राहू लागले होते.

तसेच, कालांतराने तरुणीचा फोन बंद येऊ लागला. त्यामुळे तरुणीचे वडील ती राहत असलेल्या दिल्लीतील छतरपूर येथील फ्लॅटवर पोहोचले, जिथे त्यांची मुलगी भाड्याने राहत होती. वडील पोहोचले तेव्हा प्लॅटला कुलुप होते. यानंतर त्यांनी त्वरीत मेहरौली पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात त्यांनी आरोपी तरुणाला पकडले.

त्याचवेळी, आरोपीने आपल्या कबुलीजबाबत सांगितले की, अनेकदा ती मला लग्नासाठी दबाव टाकत होती. यावरुन आमच्यात वादही झाला होता. 18 मे रोजी झालेल्या वादात मी तिचा गळा दाबून खून केला. यानंतर दिल्लीतील विविध भागात तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकून दिले. शिवाय, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला असून मृत तरुणीच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT