गोव्यात बड्डे पार्टी साजरा करण्याची हौस, दिल्लीतील युवकांना चांगलीच महागात पडली आहे. दिल्लीतील रोहित आणि बॉबी या दोन युवकांनी गोव्यात वाढदिवसाची पार्टी साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी चोरी, दरोडे टाकले आहेत. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दोघांना अटक केली आहे. दोघांचाही तब्बल विविध दहा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आले आहे.
(Two Delhi guys Held for theft and dacoity as they wanted to celebrate birthday party in Goa)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी रोहित आणि बॉबी या दोन युवकांना द्वारका परिसरातून अटक केली आहे. या दोघांचा शहरातील स्नॅचिंग, चोरी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या 10 गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 392 (दरोडा), 397 (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न) असे डीसीपी म्हणाले.) आणि 34 (धमकी) असे गुन्हे या दोघांविरोधात नोंदविण्यात आले आहेत.
पोलिसांनी विविध घटनास्थळी भेट देऊन जवळपास बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना ताब्यात घेतले. तसेच, दोघांवर गुप्त पद्धतीने पाळत देखील ठेवण्यात आली होती. सर्व माहितीच्या आधारे मोहन गार्डन परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपींचा झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन मोबाईल फोन, एक चाकू आढळून आला. आोरपी बॉबीचा वाढदिवस गोव्यात साजरा करण्यासाठी दोघांनी मिळून गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.