Delhi High Court
Delhi High Court Dainik Gomantak
देश

Delhi High Court: ''तुम्ही तीन वर्षे झोपला होता का?'' हायकोर्टाने काँग्रेसला फटकारले; आयकर प्रकरणात मोठा झटका

Manish Jadhav

Income Tax Case:

आयकर प्रकरणात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला फटकारले. तीन वर्षे तुम्ही झोपला होता का, असा सवाल केला. दिल्ली न्यायालयानेही आपला निर्णय राखून ठेवला. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने आपला अर्ज फेटाळल्यामुळे काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने 105 कोटींहून अधिकच्या थकबाकीच्या वसुलीसाठी काँग्रेसला नोटीस बजावली आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशात कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगत निर्णय राखून ठेवला. न्यायालयाने नमूद केले की, काँग्रेसविरोधात ही कारवाई 2021 मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने कडक भूमिका घेत, ते अजूनही झोपलेले आहेत का, अशी विचारणा केली. हे प्रकरण अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आले आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

निकाल देताना खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्त्याने स्वत:ला दोष द्यावा. हे प्रकरण 2021 मधील आहे आणि आपण यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असे दिसते. 2021 पासून याचिकाकर्त्याच्या कार्यालयात कोणीतरी झोपले होते असे दिसते. यादरम्यान, खंडपीठाने सूचित केले की, या प्रकरणाचा निर्णय बुधवार, 13 मार्च रोजी येऊ शकतो. काँग्रेसतर्फे ज्येष्ठ वकील विवेक तनखा यांनी न्यायालयात हजेरी लावत पक्षाची खाती गोठवण्यात आल्याचे सांगितले. असेच सुरु राहिले तर पक्षाला मोठा फटका बसेल.

दुसरीकडे, आयटीएटीने शुक्रवारी काँग्रेसची याचिका फेटाळली होती, ज्यामध्ये पक्षाच्या बँक खात्यांवरील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसशी संबंधित चार बँक खाती गोठवली होती. आयकर विभागाने 210 कोटी रुपयांची रिकव्हरी मागितली आहे. म्हणजेच काँग्रेसला ही रक्कम आयकर विभागाला दंड म्हणून भरावी लागणार आहे. पक्षाने याविरुद्ध आयकर अपील प्राधिकरणात (आयटीएटी) अपील केले होते, मात्र हे अपील फेटाळण्यात आले.

खाती का गोठवली?

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण 2018-2019 च्या आयकर रिटर्नशी संबंधित आहे. आयकर विभागाने काँग्रेसकडून दंड म्हणून 210 कोटी रुपयांची रिकव्हरी मागितली आहे. माकन यांच्या मते या कारवाईमागे दोन कारणे आहेत. पहिले- आम्हाला आमच्या खात्याशी संबंधित माहिती 31 डिसेंबर 2019 पर्यंत आयकर विभागाला द्यायची होती. त्यावेळी रिटर्न 40-45 दिवस उशिरा सब्मिट केला होता. सामन्यत: 10-15 दिवस उशिरा रिटर्न सब्मिट केला जातो. दुसरे कारण म्हणजे 2018-19 हे निवडणुकीचे वर्ष होते. त्या निवडणुकीच्या वर्षात काँग्रेसने 199 कोटी रुपये खर्च केले होते. त्यापैकी 14 लाख 40 हजार रुपये काँग्रेस खासदार आणि आमदारांनी त्यांच्या पगाराच्या रुपात जमा केले होते. हे पैसे रोख स्वरुपात जमा करण्यात आले होते. मात्र, रोख रक्कम मिळाल्यामुळे आयकर विभागाने काँग्रेसला 210 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अजय माकन यांनी हे आरोप केले होते

दुसरीकडे, 16 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे सेक्रेटरी आणि ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी सांगितले की, पक्ष आणि युवक काँग्रेसची चार बँक खाती आयकर विभागाने गोठवली आहेत. त्याचबरोबर त्यांनी आयकर रिटर्न प्रकरणी 210 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. तनखा म्हणाले की, आयटीएटीने काँग्रेसला बँक खाती चालवण्याची परवानगी दिली होती की त्यांच्यावर फक्त धारणाधिकार असेल. तथापि, आयकर विभागाने असा युक्तिवाद केला की, त्यांनी बँकांना काँग्रेसच्या बँक खात्यातील व्यवहार गोठवण्याचे आदेश जारी केले नाहीत. पक्षाच्या खात्यातून 65 कोटी रुपये काढल्याचा आरोपही त्यांनी आयटीकडे केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: मोटारसायकल पायलट थोडक्यात बचावला!

Mormugao Municipality: मुरगाव पालिका समस्यांच्या गर्तेत

Goa PWD: नवीन बोरी पुलाचा आराखडा शेतकऱ्यांना समजावून सांगणार; विभाग अधिकारी

Goa Honey Trap Case: ‘हनी ट्रॅप’प्रकरणी आरोप निश्चितीचा आदेश रद्द

Anjuna News: पोलिस बंदोबस्तात हणजुणेतील बेकायदा गाळा पाडला

SCROLL FOR NEXT