Delhi High Court Dainik Gomantak
देश

Delhi High Court: चूक नाही केली; बुरख्याशिवाय पोलिस ठाण्यात नेल्याप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Delhi Police: न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी पोलिसांना संवेदनशील करण्याच्या सूचना देण्याची मागणी फेटाळून लावली.

Manish Jadhav

Delhi High Court: एका मुस्लीम महिलेने तिला बुरख्याशिवाय पोलिस ठाण्यात नेल्याची तक्रार केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला. तिची पोलीस ठाण्यात बुरख्याशिवाय परेड काढल्याचे तिने सांगितले. मात्र, न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी पोलिसांना संवेदनशील करण्याच्या सूचना देण्याची मागणी फेटाळून लावली.

बार आणि बेंचच्या रिपोर्टनुसार, याचिकाकर्त्या महिलेने मागणी केली की, धार्मिक श्रद्धा आणि वैयक्तिक पसंतीमुळे बुरखा घालणाऱ्या महिलांच्या अधिकारांबाबत पोलिसांनी संवेदनशील व्हायला हवे. दरम्यान, पोलीस तपासात गुप्ततेला स्थान असू शकत नाही, कारण सुरक्षा पुनर्संचयित करण्यासाठी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी ओळख महत्त्वाची आहे, असे न्यायालयाने म्हटले. धार्मिक प्रथा किंवा वैयक्तिक पसंतीच्या नावाखाली गोपनीयतेला परवानगी दिल्याने गैरवापराचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि तपास प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, यावर न्यायालयाने जोर दिला.

दरम्यान, रकाब गंज परिसरात भांडण झाल्याची माहिती मिळताच याचिकाकर्त्या रेश्माला दिल्ली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रेश्मा ही तीन आरोपींची बहीण आहे, ज्यांच्यावर दोन लोकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा त्यावेळी बाल्कनीतून रस्त्यावरील सर्व काही पाहत होती आणि तिने बुरखा घातला नव्हता. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रेश्माने स्वत: सांगितले होते की तिला पोलिस स्टेशनमध्ये नेले पाहिजे कारण तिला प्रत्युत्तराच्या हल्ल्याची भीती होती.

दुसरीकडे, रेश्माच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, पोलीस अधिकारी जबरदस्तीने घरात घुसले आणि पहाटे तीन वाजता तिला ओढत चांदनी महल पोलीस ठाण्यात आणले. वकिलाने सांगितले की, रेश्माला बुरखा घालायला वेळ दिला गेला नाही, हे पोलिसांना माहीत असतानाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT