Delhi Police Dainik Gomantak
देश

धक्कादायक! LGBT समुदायातील 2 बांगलादेशी तरुणांवर सामूहिक बलात्कार; 5 मुलांनी केला अत्याचार

Delhi Foreign Youth Brutality Case: राजधानी दिल्लीतील शकरपूर भागात दोन बांगलादेशी तरुणांवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Delhi Foreign Youth Brutality Case: राजधानी दिल्लीतील शकरपूर भागात दोन बांगलादेशी तरुणांवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही तरुण एलजीबीटी समुदायातील असल्याचे सांगितले जात असून ते रामलीला पाहून परतत होते.

वाटेत पाच मुलांनी त्यांना जबरदस्तीने उद्यानात नेले. तिथे त्यांनी त्यांच्याशी गैरकृत्य केले. दिल्ली पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. 20 वर्षीय देवाशिष वर्मा, 21 वर्षीय सुरजीत आणि 20 वर्षीय आर्यन अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी शकरपूर येथील रहिवासी आहेत.

गे डेटिंग अॅपवर भेटलो

बांगलादेशी तरुण हे समलिंगी जोडपे आहेत. एक तरुण दिल्लीत शिक्षणासाठी राहतो. तर दुसरा सध्या येथे त्याला भेटण्यासाठी आला होता. एका गे डेटिंग अॅपवर दोघांची मैत्री झाली होती. हे दोघेजण रामलीला पाहून परतत होते.

त्याचवेळी दिल्लीत राहणाऱ्या तरुणाचा जुना मित्र त्यांना भेटला होता. हा मित्र मुख्य आरोपी (Accused) असल्याचे बोलले जात आहे. तो गे समुदायातील असल्याचेही सांगितले जात आहे.

दोन्ही तरुण समलिंगी असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. यानंतर तो त्यांच्याकडे सेक्सची मागणी करु लागला. दरम्यान त्याने त्याच्या चार मित्रांना फोन केला होता. आरोपींनी दोघांनाही बेदम मारहाण करुन उद्यानात नेले.

यानंतर सामूहिक बलात्कार झाला. बुधवारी रात्री पोलिसात (Police) तक्रार करण्यात आली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 20 हवालदारांची टीम तयार केली होती.

3 आरोपींना अटक करण्यात आली

सुमारे 50 सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर आणि अनेक एलजीबीटी लोकांची चौकशी केल्यानंतर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य दोघांचा शोध सुरु आहे. आरोपी दिल्लीबाहेर जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी पीडितांची वैद्यकीय तपासणी केली आहे. मारहाणीनंतर आरोपींनी या लोकांशी गैरवर्तन केले. तेथून पुरावे गोळा केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT