Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia Dainik Gomantak
देश

Manish Sisodia Bail Order: मनीष सिसोदियांच्या वाढल्या अडचणी, जामिनावर 6 मार्चला होणार सुनावणी

Delhi Politics: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी सुरु आहे.

Manish Jadhav

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी सुरु आहे. सीबीआयने सिसोदिया यांच्या आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.

सिसोदिया तपासात सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांनी केला आहे. सिसोदिया यांच्या वकिलाने रिमांडच्या मागणीला विरोध केला आहे. तपासात असहकार्य हा रिमांडचा आधार असू शकत नाही, असे सिसोदिया यांच्या वकिलाने म्हटले आहे.

कोर्टाने विचारले - किती दिवस चौकशी?

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीबीआयला (CBI) विचारले की, या कोठडीत मनीष सिसोदिया यांची किती दिवस चौकशी करण्यात आली? त्यावर सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, ते अजूनही सहकार्य करत नाहीत.

मनीष सिसोदिया यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी सीबीआयच्या रिमांड वाढवण्याच्या याचिकेला विरोध केला. सिसोदिया यांचे वकील कृष्णन यांनी असा युक्तिवाद केला की, सीबीआय कोठडी वाढवण्याची मागणी करणे योग्य नाही.

10 मार्च रोजी जामिनावर सुनावणी होणार आहे

अटकेतील दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या जामीन याचिकेवर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 6 मार्च रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने सीबीआयला नोटीसही बजावली आहे. मनीष सिसोदिया यांना होळीपूर्वी जामीन मिळू शकत नाही आणि ते सध्या सीबीआयच्या ताब्यात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT