Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia and Satendra Jain
Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia and Satendra Jain  Dainik Gomantak
देश

Delhi Politics: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अन् सतेंद्र जैन यांनी मंत्रीपदाचा दिला राजीनामा

Manish Jadhav

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia and Satendra Jain: दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सतेंद्र जैन यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे, ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारले आहेत.

दारु घोटाळ्यात सीबीआयच्या चौकशीत आलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन यांनीही आपले पद सोडले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. अरविंद केजरीवाल सरकारमधील दोन बड्या मंत्र्यांवर तपास यंत्रणांची टांगती तलवार आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी दिल्लीतील आम आदमी पक्षावर आधीच हल्लाबोल केला होता.

केजरीवाल सरकारचे मंत्री आता तुरुंगातून सरकार चालवतील, असा टोला भाजप आणि काँग्रेस सातत्याने लगावत होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सिसोदिया आणि दिल्लीचे तुरुंगमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.

दरम्यान, मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा धक्का बसला आहे. उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले की, "आम्ही सध्याच्या परिस्थितीत अनुच्छेद 32 अंतर्गत याचिका स्वीकारण्यास इच्छुक नाही."

त्याचबरोबर, केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तिहार तुरुंगात आधीच दाखल झाले आहेत. सत्येंद्र जैन आणि त्यांची पत्नी पूनम आणि इतरांविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात एक खटला नोंदवला गेला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सत्येंद्र जैन यांच्या कुटूंबाशी संबंधित सुमारे 8.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT