Crime News Dainik Gomantak
देश

Delhi Crime: ॲसिड हल्ल्याच्या घटनेनं देशाची राजधानी हादरली; अल्पवयीन मुलाचं घृणास्पद कृत्य!

Delhi Crime: देशाची राजधानी (दिल्ली) ॲसिड हल्ल्याच्या घटनेने हादरली. इथे एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला केला.

Manish Jadhav

Delhi Crime: देशाची राजधानी (दिल्ली) ॲसिड हल्ल्याच्या घटनेने हादरली. इथे एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला केला. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील बुराडी भागात घडली. पोलिसांनी सांगितले की, मुलीवर ॲसिड फेकल्यानंतर त्या मुलाला स्थानिक लोकांनी पकडले आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पुढे सांगितले की, ॲसिड हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचा पीडित मुलीसोबत वाद होता. त्यामुळे तो खूप तणावाखाली होता. मुलीशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने पीडितेवर ॲसिड फेकले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326 बी आणि 341 नुसार गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी घडली. ॲसिड हल्ल्याने दिल्ली पुन्हा एकदा हादरली.

या घटनेबाबत, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, बुराडी भागातील परशुराम एन्क्लेव्हमध्ये 11वीत शिकत असलेली विद्यार्थिनी तिच्या भावासोबत मोटरसायकलवरुन जात होती. त्याचवेळी, दुचाकीवरुन आलेल्या या अल्पवयीन मुलाने तिच्यावर (पीडित मुलगी) ॲसिड फेकले. त्यानंतर मुलीला तात्काळ बुराडी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, या अल्पवयीन मुलाला महिला आणि मुलींप्रती द्वेष होता.

दरम्यान, रागाच्या भरात त्याने या मुलीला लक्ष्य केले. तो या मुलीला आधी ओळखत नव्हता असेही बोलले जात आहे. आरोपी मुलाला पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यानंतर मिळालेल्या पुराव्याच्या आधारे ते आरोपीपर्यंत पोहोचले. या अल्पवयीन विद्यार्थीनीवर मुलाने जे ॲसिड फेकले ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अल्पवयीन मुलाला सध्या बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अद्याप अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT