Delhi Chief Minister Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Delhi Liquor Scam Case: केजरीवालांना दिलासा नाहीच; 7 मे पर्यंत कोठडीत वाढ!

Delhi Liquor Scam Case: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Delhi Liquor Scam Case: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. आता पुढील हजेरी 7 मे रोजी होणार आहे. त्यांच्यासोबतच के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीतही न्यायालयाने वाढ केली आहे. अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी तुरुंगातून व्हीसीमार्फत न्यायालयात हजर झाले होते. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबतही राजकारण शिगेला पोहोचले आहे. एकीकडे आम आदमी पक्षाने तिहार जेल प्रशासनावर आरोप केला की, केजरीवाल यांना शुगर आहे पण तरीही त्यांना इन्सुलिन दिले जात नाहीये. या गदारोळानंतर पहिल्यांदाच केजरीवाल यांना इन्सुलिन देण्यात आले. दुसरीकडे, तुरुंग प्रशासनाने आम आदमी पक्षाचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून अरविंद केजरीवाल पूर्णपणे ठीक असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्तींनी आता केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि रिमांडला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT