Arvind Kejriwal Arrested Dainik Gomantak
देश

Arvind Kejriwal Arrested: केजरीवालांना कोर्टाचा मोठा धक्का; 28 मार्चपर्यंत सुनावली ईडी कोठडी!

Delhi Excise Policy Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला.

Manish Jadhav

Delhi Excise Policy Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यासोबतच कोर्टाने केजरीवालांना 6 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. केजरीवाल यांना आता 28 मार्च रोजी कोर्टात हजर केले जाणार आहे. दिल्लीतील कथित दारु घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी संध्याकाळी अटक केली.

दरम्यान, राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल राजू यांनी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. केजरीवाल यांनी इतर नेत्यांसोबत कट रचला. दिल्लीत नवीन अबकारी धोरण लागू करण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग होता. या संपूर्ण प्रकरणात पीएमएलए अंतर्गत अनेक आरोप करण्यात आले आहेत. तज्ज्ञ समिती, ज्यांचे काम धोरणासाठी मते गोळा करण्याचे होते, मात्र त्यांनी कोणतेही काम केले नाही.

सहाय्यक सॉलिसिटर जनरल राजू म्हणाले की, मनीष सिसोदिया यांनीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिसोदिया यांचाही जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. एएसजीने कोर्टाला सांगितले की, सिसोदिया यांनी विजय नायर यांना केजरीवाल यांच्या घरी बोलावले आणि त्यांना अबकारी धोरणाशी संबंधित कागदपत्रे दिली. विजय नायर अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांच्यासाठी काम करत होते. विनय नायर हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ राहत होते, ते आप पक्षाचे मीडिया प्रभारी होते.

गोव्यात हवालाद्वारे 40 कोटी हस्तांतरित

सहाय्यक सॉलिसिटर जनरल राजू यांनी पुढे सांगितले की, गोव्यात हवालाद्वारे 40 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. प्रिन्स कुमारने गोवा निवडणुकीसाठी सागर पटेल यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांच्या कॉल रेकॉर्डवरुन याची पुष्टी झाली होती. चरणप्रीत सिंग नावाच्या व्यक्तीने गोव्यात आम आदमी पार्टीसाठी पैशांची व्यवस्था केली होती. त्याने विजय नायर यांच्या चॅरियट मीडिया कंपनीत काम केले. चरणप्रीत सिंग याची दिल्ली सरकारने PR साठी 55,000 रुपये मासिक पगारावर नियुक्ती केली होती. ईडीने सांगितले की, आमच्याकडे चॅट्सही आहेत, ज्यामुळे याची पुष्टी झाली आहे. एवढेच नाही तर बहुतांश दारु विक्रेत्यांनी मोठी रक्कम दिली होती. केजरीवाल यांचे सर्व काम विजय नायर करत असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. पैसे गोळा करणे आणि लोकांना धमकावणे हे त्यांचे काम होते.

के. कविता यांनी आप ला 300 कोटी दिले

ईडीने कोर्टाला सांगितले की, विनय नायर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ राहत होते, ते आप पक्षाचे मीडिया प्रभारी होते. के. कविता यांनी आप पक्षाला 300 कोटी दिले होते. बुच्ची बाबूच्या माध्यमातून दोनदा हे पैसे हस्तांतरित करण्यात आले, पहिल्यांदा 10 कोटी आणि नंतर 15 कोटी. केजरीवाल यांना पंजाब आणि गोवा निवडणुकीसाठी निधी हवा होता. विजय नायर हे केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात.

केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली

दुसरीकडे, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी होणार होती, मात्र केजरीवाल यांनी आपली याचिका मागे घेतली. ईडीची टीम गुरुवारी संध्याकाळी उशिरा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. दोन तासांच्या चौकशीनंतर आणि त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT