31st December History | 31st December Dainik Gomantak
देश

31 December :आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...वाचा

31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी अनेक महत्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी अनेक महत्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

वर्ष 1600 - ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company)-

ईस्ट इंडिया कंपनी ही एक खाजगी व्यापारी कंपनी होती. 1600 च्या शतकाच्या शेवटच्या दिवशी राणी एलिझाबेथ I च्या घोषणेद्वारे याची स्थापना करण्यात आली. ही लंडनच्या व्यापार्‍यांची कंपनी होती, जिला पूर्वेकडील व्यापाराची मक्तेदारी देण्यात आली होती. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट पैसे कमविणे हेच होते. 1608 मध्ये कंपनीचे पहिले व्यापारी जहाज भारतात सुरतला पोहोचले, कंपनीला मसाल्याचा व्यापारी म्हणून आपला व्यवसाय सुरू करायचा होता. सन 1708  मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी 'न्यू कंपनी' 'ईस्ट इंडिया कंपनी'मध्ये विलीन झाली. पुढे या कंपनीनं आपलं जाळं इतकं मजबूत केलं की इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं. 

वर्ष 1910  - मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म (Mallikarjun Mansoor)-

हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, नीलकंठबुवा अलुरमठ आणि  जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले. पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांचा मृत्यू 12 सप्टेंबर 1992 रोजी झाला.

वर्ष 1926  - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा मृत्यू -

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगडमधील वरसईमध्ये 24 जून 1863 साली झाला होता.  त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे 22 खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. 1898 साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. 

वर्ष 1984 - राजीव गांधी भारताचे सातवे पंतप्रधान बनले (Rajiv Gandhi)

राजीव गांधींनी आजच्याच दिवशी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. वयाच्या 40 व्या वर्षी ते भारताचे पंतप्रधान झाले होते. ते सर्वात तरुण पंतप्रधान होते.   त्यांच्या मातोश्री   इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48 वर्षांच्या होत्या तर त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळी ते 58 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली.

वर्ष 1997  - स्वरराज छोटा गंधर्व यांचं निधन-

सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे या गावी 10 मार्च 1918 रोजी  झाला होता. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.  ते मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार म्हणून नावारुपाला आले. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द 50  वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. 

2019 - कोरोनाचा विषाणू 'कोविड 19' वर शिक्कामोर्तब-

2019 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (World Health Organization) पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये "व्हायरल न्यूमोनिया" प्रकरणांची माहिती मिळाली. हा रोग नंतर COVID-19 असल्याचे निश्चित केले गेले. यापुढं काय घडलं ते आपण पाहिलंच. जगभरात या व्हायरसनं धुमाकूळ घातला. लाखो लोकांचे बळी या कोरोनानं घेतले. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन करावा लागला. अजूनही हा विषाणू पूर्णपणे संपलेला नाही.  जे पुढील वर्षी जागतिक महामारी बनले.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT