DA Hike Dainik Gomantak
देश

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार? समोर आली मोठी अपडेट

DA Hike for Central Government Employees: देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी सध्या महागाई भत्ता म्हणजेच DA Hike च्या पुढील घोषणेची प्रतीक्षा करत आहेत.

Sameer Amunekar

देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी सध्या महागाई भत्ता म्हणजेच DA Hike च्या पुढील घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. सातवा वेतन आयोग लागू असतानाच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा बदल केला जातो. जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यांपासून DA मध्ये सुधारणा लागू केली जाते. जानेवारीच्या वाढीची घोषणा साधारणपणे मार्च किंवा एप्रिलमध्ये होते, तर जुलैच्या वाढीबाबतचा निर्णय अनेकदा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जातो. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकार DA वाढीची घोषणा करणार का, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर घोषणा करण्याची मागणी

DA वाढीच्या घोषणेबाबत तज्ज्ञांकडून सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशन आणि नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनजीत पटेल यांनी सरकारने कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्याची भूमिका घ्यावी, असे म्हटले आहे.

त्यांच्या मते, सरकार सप्टेंबरच्या सुरुवातीला DA वाढ जाहीर करण्याचा विचार करत असेल तर रक्षाबंधनाच्या निमित्तानेच त्याची घोषणा केली जाऊ शकते. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनही एक-दोन दिवस आधी जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा सण अधिक आनंददायी होऊ शकतो.

सध्या किती आहे महागाई भत्ता?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये याआधी 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता पुढील सुधारणा किती असेल, याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत.

महागाई भत्त्यातील बदलासाठी ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI मधील महागाईचा कल महत्त्वाचा ठरतो. त्यानुसार पुढील DA वाढीचा अंदाज बांधला जात आहे. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे यावेळी दोन ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 टक्के वाढ झाली तर DA किती होईल?

जर सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केली, तर सध्याचा 60 टक्के DA थेट 63 टक्क्यांवर जाऊ शकतो. याचा थेट फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीनुसार DA मध्ये होणारी वाढ वेगवेगळी असेल.

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 50 हजार रुपये असल्यास 3 टक्के अतिरिक्त DA म्हणजे महिन्याला 1,500 रुपयांची वाढ होऊ शकते. अर्थात, प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्याच्या बेसिक पे आणि लागू नियमांनुसार ठरेल.

8वा वेतन आयोगही चर्चेत

DA वाढीसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे आहे. नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर वेतनरचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसारच DA मध्ये नियमानुसार सुधारणा केली जाणार आहे.

त्यामुळे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA वाढ हीच सर्वात तातडीची अपेक्षा आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होते आणि किती टक्के वाढ मंजूर केली जाते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सणासुदीच्या काळात मिळू शकतो आर्थिक दिलासा

रक्षाबंधन, ओणम आणि त्यानंतर येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर DA वाढीची घोषणा झाल्यास लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. मात्र, सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत DA मध्ये 2 किंवा 3 टक्के वाढ निश्चित असल्याचे मानता येणार नाही. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी DA वाढीची घोषणा होणार का, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT