AIADMK Leader D Jayakumar Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: बैलगाडीत बसून निषेध आंदोलन; अद्रमुकच्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

AIADMK Leader D Jayakumar Viral Video: तामिळनाडूचे माजी मंत्री आणि AIADMK चे ज्येष्ठ नेते डी जयकुमार सध्या त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहेत.

Manish Jadhav

AIADMK Leader D Jayakumar Viral Video: तामिळनाडूचे माजी मंत्री आणि AIADMK चे ज्येष्ठ नेते डी जयकुमार सध्या त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. डी जयकुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, AIADMK नेते डी जयकुमार रस्त्यावर बैलगाडी चालवत असून राज्यातील द्रमुक सरकारचा निषेध करत आहेत. जयकुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये माजी मंत्री डी जयकुमार गजबजलेल्या रस्त्यावर बैलगाडी चालवताना दिसत आहेत. त्याचवेळी, बैलगाडी चालवत असताना काही लोक त्यांच्या मागे धावताना दिसत आहे. माजी मंत्र्याची ही स्टाईल पाहून रस्त्यावर उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

द्रमुक सरकारला विरोध

DMK पक्षाने निवडणुकीदरम्यान इंधन सबसिडी देण्याचे आश्वासन दिले होते, पक्षाने 2021 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, द्रमुक सरकारने हे आश्वासन अद्याप पूर्ण केले नसल्याचे डी जयकुमार यांचा दावा आहे.

विरोधी पक्षनेते डी जयकुमार यांनी वाशरमेनपेट येथे राज्य सरकारने (Government) दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात दिरंगाई केल्याचा निषेध केला. बैलगाडी सवारीचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

माजी मंत्र्यांचा राज्य सरकारला सवाल

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना डी जयकुमार म्हणाले की, राज्यात द्रमुकचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात गॅस सिलिंडर आणि पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवर सबसिडी देण्याबाबत सांगितले होते. आता, द्रमुकची सत्ता येऊन 29 महिने झाले, परंतु अद्याप या अनुदानांचा पत्ता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT