Surat, Gujrat Dainik Gomantak
देश

दिवाळीला घरी जाण्यासाठी सुरत रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू, चार बेशुद्ध

दिवाळी निमित्त घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

Pramod Yadav

Surat, Gujrat: गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. दिवाळी निमित्त घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

लोक ट्रेनने आपापल्या घरी जाण्यासाठी स्टेशनवर वाट पाहत होते याच दरम्यान बिहारला जाणारी ट्रेन स्टेशनवर आली आणि त्यात चढताना प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यावेळी तीन ते चार जण बेशुद्ध झाले.

सुरत रेल्वे स्थानकावरच रुग्णवाहिकेद्वारे जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले तर, एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरतचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

सकाळी सुरत रेल्वे स्थानकावरून ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली, त्यामुळे एकच गोंधळ झाला आणि काही लोक बेशुद्ध झाले, असे पोलिस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) सरजो कुमारी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले.

'गर्दीत एक व्यक्ती कोसळला दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. अन्य दोन प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरतमधील हिरे आणि कापड उद्योगातील अनेक कामगार छठपूजेसाठी दरवर्षी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी जातात, असे एसएमआयएमईआर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी जयेश पटेल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT