Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: थेट बुलेटवर प्रेमी युगुलांचा रोमान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Manish Jadhav

Rajasthan: राजस्थानमध्ये बाईकवर बसलेल्या प्रेमी युगुलांच्या रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये तरुणी गाडीच्या टाकीवर बसलेली असून तरुण दुचाकी चालवत आहे.

असाच एक व्हिडिओ आता राजस्थानची राजधानी जयपूरमधून समोर आला आहे. ज्यामध्ये एक प्रेमी युगल होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहे. येथे व्हिडिओ पाहा...

दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडिओ जयपूरमधील (Jaipur) जवाहर सर्कल स्क्वेअरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक प्रेमी युगल बुलेटवर जाताना दिसत आहे. ही तरुणी गाडीच्या टाकीवर बसून बाईक चालवणाऱ्या तरुणाला मिठी मारत आहे. कोणीही हेल्मेट घातलेले नाही.

दुसरीकडे, खुलेआम वाहतूक नियमांचे उल्लंघन करत लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हा व्हिडिओ राजस्थानच्या (Rajasthan) वाहतूक पोलिसांपर्यंतही पोहोचला आहे. बुलेट बाईकच्या नंबरवरुन आरोपी तरुणाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. तरुणांना अटक करुन नियमानुसार कारवाई केली जाईल.

यापूर्वी, अजमेर जिल्ह्यातील एका प्रेमी युगुलाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शहरातील पुष्कर रोडवर एक तरुण आणि एक तरुणी मोटारसायकलवर खुलेआम रोमँटिक स्टंट करताना दिसले होते.

तरुण दुचाकी चालवत होता आणि तरुणी त्या तरुणाकडे तोंड करुन पेट्रोल टाकीवर बसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT