amarnat.jpg 
देश

Coronavirus: अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द

गोमंन्तक वृत्तसेवा

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) कमी झाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) रद्द करण्यात आली आहे. मागील वर्षीही कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. अमरनाथ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. दरम्यान, 28 जूनपासून भाविकांना बाबा अमरनाथाचे ऑनलाइन (Online) दर्शन घेता येणार आहे. पहलगाम (Pahalgam) आणि बालटालमार्गे (Baltal) 56 दिवसांसाठी यात्रा 28 जून पासून सुरु होणार होती. आणि 22 ऑगस्टला संपणार होती. (Coronavirus  Amarnath Yatra canceled for second year in a row)

याआगोदर एप्रिल महिन्यामध्ये अमरनाथजी श्राईन बोर्डाने (Shri Amarnath Ji Shrine Board) पवित्र गुफेची यात्रा रद्द करणार असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकही जाहीर करण्यात आले होते. परंतु काही क्षणातच अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा आदेश रद्द करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) माहिती संचालनालयानं  मागे घेतला होता. दरवर्षी जून महिन्यामध्ये या ठिकाणी अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येते. देशातून तसेच जगभरामधून लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी दर्शनाला येत असतात.

प्रक्षेपण थेट करणार
यंदाच्या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली असली तर बोर्डाने भाविकांसाठी सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण आणि व्हर्च्युअल दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अमरनाथ यात्रा पार पडणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी पारंपारिक विधी पार पाडले जाणार असल्याचे जम्मू काश्मीरच्या प्रशासनानं स्पष्ट केले आहे.
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT