COVID Updates in India Dainik Gomantak
देश

देशात कोरोना रुग्ण वाढले; एका दिवसात 3 हजार नवे रुग्ण

दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये फैलावाचा वेग अधिक

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : भारतात कोरोनाव्हायरचा संसर्ग मंदगतीने वाढत असला तरी रुग्णसंख्येतील वाढीमूळे देशात कोरोनाच्या नवीन लाटेचा धोका वाढला आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्रासह 6 राज्ये अशी आहेत. जिथे गेल्या 24 तासांत 100 हून अधिक नवीन रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. (Corona patients grew in india )

देशात दोन महिन्यांनंतर संसर्गाचे प्रमाणही 1 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. गेल्या 24 तासांमध्ये सकारात्मकता दर 1.07% होता. दिल्लीत कोरोनाचे 1,485 नवीन रुग्ण केरळमध्ये कोरोनामुळे 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूचा वेगात वाढ होत आहे. 24 तासांत देशात 3,157 नवीन रुग्ण आढळले असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय प्रकरणे देखील 19,500 पर्यंत वाढली आहेत. देशात 20 हून अधिक राज्ये आहेत जिथे कोरोनाचा आलेख वाढत आहे.

दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांची झालेली वाढ. ही 100 हून अधिक नवीन आढळत असल्याने राज्यांनी संसर्ग अटकावसाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक असून राज्य सरकारनी योग्य काळजी घ्यावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ही सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेत काय खबरदारी घेता येईल याबाबत चर्चा केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,आता देशातील कोरोना सकारात्मकता दर देखील 1% च्या पुढे वाढला आहे. दोन महिन्यांनंतर, संसर्गाचे प्रमाण 1 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. यापूर्वी 27 फेब्रुवारीला संसर्ग दर 1.11% होता. वाढता सकारात्मकता दर देखील कोरोनाच्या नवीन लाटेकडे निर्देश करत आहे, कारण हा दर जितका जास्त असेल तितका संसर्ग टिकतो अशी ही माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT