Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

Congress नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची मागितली माफी, 'चुकून ते शब्द निघाले'

Congress leader: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी 'राष्ट्रपत्नी' या शब्दावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे.

दैनिक गोमन्तक

Senior Congress leader Adhir Ranjan Chaudhary: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी 'राष्ट्रपत्नी' या शब्दावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. शुक्रवारी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ही माफी मागितली. माझ्याकडून चुकून ते शब्द निघाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांच्या 'राष्ट्रपत्नी' या वक्तव्यावर संसदेत बराच गदारोळ झाला. आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी राष्ट्रपतींची माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून काँग्रेस नेत्याकडून करण्यात येत होती.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पाश्वभूमीवर माध्यमाशी खास बातचीत केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की, भाजप पराचा कावळा करत आहे. देशात महागाईचा भडका उडाला आहे. आम्ही महागाईवर चर्चा करण्याची मागणी करत आहोत. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सभागृहात आंदोलन करत आहोत, मात्र मोदी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

चौधरी पुढे म्हणाले, 'अग्निपथबाबत आम्ही सभागृहात चर्चेची मागणी केली होती. ईडी (ED), सीबीआयच्या (CBI) गैरवापराबद्दल विरोधक सातत्याने बोलत आहे. सभागृहात आम्ही जनतेचे मुद्दे उपस्थित करत आहोत. त्यासाठी आता आम्ही राष्ट्रपतींना भेटून आमचे म्हणणे मांडणार आहोत.'

चौधरी पुढे म्हणाले, 'विजय चौकातून आम्ही राष्ट्रपती भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्हाला ताब्यात घेण्यात आले. आंदोलनादरम्यान, एका पत्रकाराने आम्हाला कुठे जायचे आहे, असे विचारले असता आम्हाला राष्ट्रपतींकडे जायचे आहे, असे सांगताना माझ्या तोंडून 'राष्ट्रपत्नी' निघाले. चूक झाली. मी एक बंगाली भारतीय व्यक्ती आहे. मी हिंदी भाषक नाही, मला तसे म्हणायचे नव्हते. माझा हेतू स्पष्ट होता. त्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. दुसरीकडे, सभागृहातही मला यासंबंधी म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही. सत्ताधारी पक्षाने माझ्यावर आरोप करत सभागृहाचे कामकाज ठप्प केले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT