Sonia Gandhi & Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; 21 ऑगस्टपासून Congress अध्यक्षपदाची निवडणूक

Congress President: काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Congress President: काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा सुरु झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या नव्या प्रमुखाची निवड होऊ शकते, असे वृत्त आहे. मात्र, अद्याप वायनाडचे खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याठिकाणी अनेक दिवसांपासून गैर-गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरु होती, मात्र अद्याप यावर एकमत झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मार्चमध्येच सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान राहुल आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासोबत राजीनामा देण्याची घोषणा केली होती. राहुल यांनी 2017 मध्ये काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. मात्र, तब्बल दोन वर्षांनी त्यांनी हे पद सोडले.

राहुल यांच्या नावावर वाढता पाठिंबा!

या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांचा एक मोठा वर्ग राहुल गांधींना (Rahul Gandhi) कॉंग्रेसचा अध्यक्ष बनवण्यासाठी आतुर आहे. मात्र गटबाजीने ग्रासलेल्या पक्षावर गांधी कुटुंबाचा प्रभाव आहे. आणखी एका वृत्तात असेही म्हटले जात आहे की, 'काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल यांना अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT