Udit Raj Dainik Gomantak
देश

Udit Raj: उदित राज पुन्हा बरळले, PM मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर केले हे वक्तव्य

Udit Raj Tweet: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे काँग्रेस नेते उदित राज पुन्हा एकदा बरळले.

दैनिक गोमन्तक

Udit Raj Controversy: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे काँग्रेस नेते उदित राज पुन्हा एकदा बरळले. ज्यामुळे ते आता भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निशाण्यावर आले आहेत. उदित राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याबाबत आणि आरएसएसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पीएम मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर उदित राज यांचे ट्विट

काँग्रेस नेते उदित राज यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले असून आरएसएसने दुसऱ्याला पंतप्रधान बनवावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले की, ''प्रयागराजमध्ये धर्मांतर होत असल्याने आरएसएस चिंतेत आहे. पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदा केदारनाथला पोहोचले. आजकाल बहुतांश वेळ त्यांचा तीर्थक्षेत्रांमध्येच जात आहे. मोदीजींनी हिंदू धर्मातील दुष्कृत्ये नष्ट करण्यासाठी पूर्ण वेळ द्यावा, जेणेकरुन धर्मांतर थांबेल आणि पंतप्रधान दुसऱ्या कोणाला तरी करावे.''

उदित राज यांच्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले

उदित राज यांच्या ट्विटवर भाजपने प्रत्युत्तर दिले असून भाजपचे (BJP) प्रवक्ते शाहजाद पूनावाला यांनी गुजरात निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेसमध्ये (Congress) रस्सीखेच सुरु असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले की, 'आणखी एक नमुना! शिवराज पाटील ते उदित राज पर्यंत. ही वक्तव्ये योगायोग नाहीत. हे व्होट बँकेचे प्रयोग आणि उद्योग आहेत. गुजरात निवडणुकीपूर्वी, आप आणि काँग्रेस यांच्यात त्यांच्या कट्टर हिंदूद्वेषाने व्होटबँकेचे ध्रुवीकरण कोण करु शकते, अशी स्पर्धा सुरु आहे.'

यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत वक्तव्य करण्यात आले होते

याआधी उदित राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन कोणत्याही देशाला असे राष्ट्रपती मिळू नयेत, असे म्हटले होते. त्यांनी ट्विट करुन म्हटले होते की, 'कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारखा राष्ट्रपती मिळू नये. चमचगिरीलाही मर्यादा आहेत. असे म्हणतात की, 70% लोक गुजरातचे (Gujarat) मीठ खातात. स्वतः मीठ खाऊन जीवन जगले तर कळेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT