Priyanka Gandhi Dainik Gomantak
देश

Priyanka Gandhi-Vadra: ...तर आम्ही अग्निपथ योजना रद्द करू!

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील सभेत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रांचे आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

Priyanka Gandhi-Vadra: केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास अग्निपथ योजना रद्द करू, असे आश्वासन काँग्रसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनी दिले. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी राज्यातील कांगडा येथे झालेल्या सभेत तत्या बोलत होत्या. (Himachal Pradesh Assembly Election 2022)

प्रियांका गांधी-वद्रा म्हणाले, गेल्या 5 वर्षात किती युवकांना रोजगार मिळाला? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारने तीन वर्षात ५ लाख रोजगार दिले. राजस्थानमध्ये काँगेस सरकारने 1 लाख 30 हजार नोकऱ्या दिल्या. हिमाचल प्रदेशात 63 हजार सरकारी पदे रिक्त आहेत. केंद्रात आम्ही सत्तेत आलो तर अग्निपथ योजना रद्द करू. आणि आम्ही जी आश्वासने देतो, ती पुर्ण करतो. छत्तीसगडमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते आम्ही पुर्ण केले.

प्रियांका गांधी-वद्रा म्हणाल्या, हिमाचल प्रदेशात यंदा काँग्रेसचे सरकार बनेल. कांगडा ही शहिदांची भूमी आहे. मी स्वतःही शहिदाची मुलगी आहे. हिमाचल प्रदेशला राज्याच्या दर्जा देण्यासाठी इंदिरा गांधींनी प्रयत्न केटले होते. माझे घर या देवभुमीत, वीरभुमीत आहे, त्यामुळे मी सुदैवी आहे.

दरम्यान, या दौऱ्यात प्रियांका यांनी ज्वाजलामुखी मंदिरात 20 मिनटे पुजा केली. त्या आधी त्या सोलन येथील शूलिनी मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 8 डिसेंबर रोजी निकाल आहे. निकाल राज्यात विधानसभेच्या 68 जागा आहेत.

हिमाचल प्रदेशात प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपने मिशन रिपिटसाठी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर टीका करताना मोदी, शहांना दर दोन दिवसांनी हिमाचल प्रदेशात यावे लागत आहे, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT