condoms std active sex life 6 other things to do 
देश

''लैंगिक संक्रमण रोखण्यासाठी कंडोम प्रभावी नाही...'', या सहा गोष्टी करु शकतात मदत; जाणून घ्या

लैंगिक संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी कंडोमचा सर्सासपणे वापर केला जातो. कंडोमच्या वापराने संक्रमित रोगाचा धोका उद्भवत नाही.

Manish Jadhav

लैंगिक संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी कंडोमचा सर्सासपणे वापर केला जातो. कंडोमच्या वापराने संक्रमित रोगाचा धोका उद्भवत नाही. त्वचेशी संबंधित रोग टाळण्यासाठी कंडोम महत्वाचे आहे. मात्र कंडोम असे धोके कमी करत असले तरी ते संक्रमण रोखण्यासाठी शंभर टक्के प्रभावी नाही, असे नवी दिल्लीतील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. साधना सिंघल विश्नोई यांनी सांगितले आहे. एसटीआयपासून संरक्षण करण्यासाठी कंडोम ही फूल-प्रूफ पद्धत नाही, असे त्यांनी सांगितले. चला तर या सहा पॉंइटमधून हे समजून घेऊया...

1. अपूर्ण संरक्षण

कंडोम फक्त पुरुषाचे जननेंद्रिय झाकते, जननेंद्रियाचा इतर भाग उघडा राहतो. कंडोमने झाकलेले नसलेल्या भागात त्वचेच्या संपर्काने त्वचेचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे, लैंगिक संबंधात कंडोमचा वापर करुनही संक्रमणाचा धोका उद्धभवू शकतो.

2. कंडोम तुटणे किंवा घसरणे

संभोगाच्या वेळी कंडोम कधी कधी तुटते किंवा घसरते, ज्यामुळे त्यांची परिणामकारकता धोक्यात येते.

3. फंगल इन्फेशन

संभोग करताना कंडोमचा वापर फंगल इन्फेशनचा धोका हा राहतोच. म्हणून ते पूर्णपणे संरक्षणात्मक नाहीये. वेळोवेळी अशा प्रकारच्या केसेस समोर आल्या आहेत.

STDs चे संक्रमण कसे टाळावे?

एसटीडीचा प्रसार रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रथम जोखमींशी परिचित होणे. स्वतःला पार्टनरसमोर एक्सपोज होण्यापासून रोखणे, संक्रमित सिरिंजचा वापर टाळणे किंवा असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे टाळावे.

1.संभोग टाळा किंवा मर्यादित करा

लैंगिक संभोग हे STD चे एक महत्त्वाचे कारण असल्याने STD टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लैंगिक संभोग टाळणे. याव्यतिरिक्त, पार्टनरमधील मुक्त संवाद देखील महत्त्वाचा आहे. तसेच, जर तुम्ही रिलेशनशिप असाल तर तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी टेस्ट करावी.

2. लसीकरण करा

हिपॅटायटीस A आणि B, मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) इत्यादींसह विविध STD साठी लस उपलब्ध आहेत. सीडीसीच्या मते, एचपीव्ही लस योग्य वयात, मुलींसाठी 9 वर्षे आणि मुलांसाठी 9-11 वर्षे वयात दिली पाहिजे. हिपॅटायटीस लस जन्माच्या वेळी आणि पुन्हा 1 वर्षाच्या वयात दिली जाते.

4. नियमित टेस्ट करावी

जर तुम्ही वारंवार लैंगिक संभोग करत असाल, तर नियमितपणे टेस्ट करणे योग्य आहे. तुम्ही दर 14 दिवसांनी ते एका महिन्यात टेस्ट केली पाहिजे.

5. प्रीएक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) वापरण्याचा विचार करा

एसटीडी रोगांच्या यादीमध्ये एचआयव्ही संसर्ग हा सर्वात धोकादायक संसर्गांपैकी एक आहे. FDA ने एचआयव्हीचा धोका कमी करण्यासाठी दोन संयोजन औषधांना मान्यता दिली आहे, ज्यांना हा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. PrEP म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्यामध्ये दोन औषधांचा समावेश होतो - एमट्रिसिटाबाईन प्लस टेनोफोव्हिर डिसोप्रॉक्सिल फ्युमरेट (ट्रुवाडा) आणि एम्ट्रिसिटाबाईन प्लस टेनोफोव्हिर ॲलाफेनामाइड फ्युमरेट (डेस्कोव्ही). ही औषधे एचआयव्हीच्या प्रतिबंधासाठी तयार करण्यात आली आहेत. सर्व संभाव्य धोके वगळण्यासाठी एखाद्या व्यक्तीला वर्षभरात दर तीन महिन्यांनी एचआयव्ही टेस्ट करावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT