Heeraben Modi Passes Away  Dainik Gomantak
देश

Heeraben Modi Passes Away : हिराबेन मोदी यांच्या निधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त

हिराबेन मोदी यांना देशभरातील मान्यवरांनी श्रद्धांजली दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हिराबेन मोदी यांना देशभरातील मान्यवरांनी श्रद्धांजली दिली आहे.

राहुल गांधी यांनी हिराबेन यांना ट्विटर द्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही.आई जाण्याचे दुःख मोठे आहे. अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला आहे

मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांनी ट्वीट करत हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT